शाळगाव येथे ज्येष्ठ नागरीक दिन साजरा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

शाळगाव : येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक स्नेहमिलन व अनुभव कथन कार्यक्रमाचे आयोजन आज पार पडले.

यावेळी गावातील उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ट नागरिकांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परदेशात वास्तव्य केलेल्या श्रीमती इंदूमती राजाराम करांडे या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून जगन्नाथ गणपती करांडे, दिनकर रामचंद्र करांडे, सदाशिव दत्तात्रय महाजन, हाजीमौलाखान महंमद मुल्ला, विरूपाक्ष दत्तात्रय जंगम, मुरलीधर काशीनाथ क्षीरसागर, बाळकृष्ण व्यंकटेश इनामदार, चंद्रकांत बाळकृष्ण कुलकर्णी उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी गावाविषयी आपापले अनुभव कथन केले.

नेहरु युवा केंद्र सांगली व शालीग्राम मल्टिपर्पज संस्थेच्या वतीने स्त्री व पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांतसिंह महाडिक यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री. महेंद्र करांडे यांनी केले यावेळी गावातील सरपंच श्री.विजयकुमार करांडे, विठ्ठल मुळीक, सुरेश मुळीक यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळगाव येथे ज्येष्ठ नागरीक दिन साजरा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या डोल्यांची सांगता भावपूर्ण वातावरणात

कडेगाव: ऐतिहासिक डोल्यांची सांगता आज कडेगावमध्ये अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. सुरवातीला ग्रामस्थांची मिटिंग झाली ज्यामध्ये यावर्षीच्या डोल्यांमधील महत्वपूर्ण विषयांवर साधक-बाधक

Close