शुभम सातपुते यांची ‘हर मॅजेस्टी’ च्या गायन दौऱ्यासाठी निवड0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: लता मंगेशकर यांना वाहिलेल्या व भारतभर ८८ ठिकाणी सादर होणाऱ्या ‘हर मॅजेस्टी’ या कार्यक्रमासाठी चिंचणी येथील शुभम सातपुते यांची अभिनंदनीय निवड झाली आहे.

लता मंगेशकर यांच्या ८८ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेट म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. जगभरातून फक्त निवडक गायकांना यात संधी दिली जात असते.

शुभम हे अत्यंत तरुण आणि गुणी गायक असून त्यांचे अल्बम प्रसिद्ध झाले आहेत. अलीकडेच त्यांचा ‘मन सुटले’ हा अल्बम प्रसिद्ध झाला असून तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहे.

व्यवसायाने इंजिनियर असलेले शुभम जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते यांचे लहान बंधू आहेत.

लहानपणापासून गायनाची आवड असलेले शुभम यांची ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात सुद्धा निवड झाली होती.

शुभम सातपुते यांना त्यांच्या उत्कृष्ट गायन कौशल्याबद्दल अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

या निवडीबद्दल शुभम सातपुते यांचे जगभरातून अभिनंदन केले जात आहे.

 


जाहिरात

शुभम सातपुते यांची ‘हर मॅजेस्टी’ च्या गायन दौऱ्यासाठी निवड

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
भारनियमनाने कडेगावकर त्रस्त; नवीन वेळापत्रक

कडेगाव: टिकेची झोड उठल्यानंतर भलेही मोठ्या शहरातील वीज कपात रद्द करण्यात आली असली तरी निम-शहरी व ग्रामीण भागातील वीज कपात

Close