इंग्लिश बोलता न येण्यामागे मानसिक कारणे ; आधुनिक तंत्राने वेगात बोलता येणे शक्य0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: अनेक क्लास व स्वतः प्रयत्न करूनही इंग्लिश बोलता न येणाऱ्यांसाठी आणि नव्या जागतिक बाजारपेठेस कवेत घेण्यास सज्ज झालेल्या उद्योजक व व्यावसायिकांसाठी ‘सेल्फहूड’ या ज्ञानप्रकल्पामार्फत ‘Talk To The World’ या जागतिक संशोधनावर आधारीत इंग्लिश स्पिकिंग प्रोग्रॅमचे कडेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी व व्यावसायिक अश्या दोन वर्गात चालणारा हा प्रोग्रॅम दिवाळी सुट्टीनंतर दर रविवारी सुरु होत आहे.

इंग्लिश स्पिकिंग वरील ग्रामीण व निम-शहरी भागातल्या व्यावसायिकांच्या, युवक-युवतींच्या, व विद्यार्थी वर्गाच्या तसेच गृहिणींच्या समस्या अत्यंत क्लिष्ट आणि वेगळ्या प्रकारच्या असतात. एका छापाचे इंग्लिश स्पिकिंगचे कितीही कोर्स केले तरी मुळच्या मानसिक पातळीवरील समस्यांवर काम केल्याशिवाय इंग्लिश सहज बोलता येणे अशक्य असते, असे सेल्फहूड चे संस्थापक व संशोधक डॉ. गोविंद धस्के यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मराठीमधला कमकुवत संवाद आणि त्याचे शालेय शिक्षण एकूणच आपल्या सर्व प्रकारच्या भाषा शिकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम करते. त्या सर्व प्रकारातून तयार झालेल्या भीती व न्यूनगंड असलेल्या वातावरणात बहुतेक मराठी जनता इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे, कितीही प्रयत्न केले तरी चुकीच्या पद्धतीने मातृभाषा शिकण्याचा परीणाम इंग्लिश बोलण्यामध्ये अडथळा निर्माण करत असतो आणि तो दूर करणे आवश्यक असते.

विशेष पद्धतीने इंग्लिश संस्कृती व भाषा समजून घेणे, स्वतःच्या मानिसक व सामाजिक समस्यावर तज्ञांच्या मदतीने तोडगा काढणे, आणि आधुनिक पद्धतीने भाषा वापरण्याचा सतत प्रयत्न करणे, यातून अत्यंत वेगात इंग्लिश बोलता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

 ‘Talk To The World’ या प्रोग्रॅम मध्ये तीन वैयक्तीक समुपदेशन सत्रे देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, वैज्ञानिक पद्धतीने क्षमता तपासून त्यानुसार विशेष वैयक्तीक व सामुहीक मार्गदर्शन देण्यात येणार आहे. याबरोबरच, विडीओ कॉन्फरन्सिंग, एअरपोर्ट, परदेश सहल, कॉर्पोरेट मिटिंग, व्यावसायिक मेळावे अश्या प्रसंगी इंग्लिश बोलण्याचे विशेष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण १५ सत्रांचा हा विशेष प्रोग्रॅम कडेगाव इथल्या ‘शारदा कॉम्पिटीटिव्ह फोरम’ इथे राबवला जाणार आहे, याच ठिकाणी येत्या आठवड्यात डॉ. गोविंद दोन माहितीसत्रे घेणार असून इच्छुक उमेदवारांच्या शंकांना उत्तरे देणार आहेत.

अधिक माहिती व प्रवेशासाठी सेल्फहूड शी ९४२०८६५७५९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


इंग्लिश बोलता न येण्यामागे मानसिक कारणे ; आधुनिक तंत्राने वेगात बोलता येणे शक्य

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लोड शेडींग विरोधात सेनेचे सांगली येथे आंदोलन

सांगली:  सततच्या लोड शेडींग ने त्रस्त जनतेची बाजू मांडण्याचा मान पुन्हा एकदा सत्तेत असणाऱ्या भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने घेतला आहे.  लोडशेडिंग

Close