मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेला सुरवात; नोंदणी प्रारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: अतिशय उत्सुकतेने वाट पहिल्या जाणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले गेले आहे.

कडेगाव परिसरातील बालचमूमध्ये  प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा यावर्षीही नावाप्रमाणेच भव्य असणार आहे.

या स्पर्धेसाठीचे पहिले पारितोषिक ३३३३ रुपये आहे. तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे २२२२ रुपये व ११११ रुपये आहे. चौथ्या क्रमांकासाठी ७७७ रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी ५५५ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

वरील मुख्य बक्षिसांबरोबरच कै. पांडुरंग गोविंद डांगे यांचे स्मरणार्थ ट्रॉफी तसेच विजेत्या स्पर्धकांना मा. जमीर लेंगरेकर (उपायुक्त, पनवेल महानगरपालिका) यांचेतर्फे पुस्तक संच भेट दिला जाणार आहे.

या स्पर्धेसाठी प्रवेश मर्यादित असून ५० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेसाठीची किल्ला पाहणी  १७ व १८ ऑक्टोबर रोजी होणार असून पारितोषिक वितरण २२ ऑक्टोबर रोजी श्री. दत्त मंगल कार्यालय इथे केले जाणार आहे.मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेला सुरवात; नोंदणी प्रारंभ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
इंग्लिश बोलता न येण्यामागे मानसिक कारणे ; आधुनिक तंत्राने वेगात बोलता येणे शक्य

कडेगाव: अनेक क्लास व स्वतः प्रयत्न करूनही इंग्लिश बोलता न येणाऱ्यांसाठी आणि नव्या जागतिक बाजारपेठेस कवेत घेण्यास सज्ज झालेल्या उद्योजक

Close