नगरसेवक उदय देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा आदर्श0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कडेगाव नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते व भाजपाचे नगरसेवक उदय देशमुख यांनी आज वाढदिवसानिमित्त कागदी व कापडी पिशव्या वाटून पर्यावरण संरक्षणाचा नवा आदर्श जनतेसमोर ठेवला आहे.

कडेगाव नगरपंचायतच्या आणि लिबर्टी ग्रुपच्या माध्यमातून सक्रीय असणाऱ्या देशमुख यांनी आपल्या वेगळ्या पद्धतीच्या कामातून जनतेवर छाप पाडली आहे.

आज, त्यांच्या वाढदिवसादिवाशी विधायक उपक्रम म्हणून त्यांनी पर्यावरण जागृतीचा संदेश कृतीतून दिला. प्लास्टिक पिशव्या ऐवजी किराणा सामान आणि  इतर उत्पादने विकताना कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे सार्वत्रिक आवाहन त्यांनी केले आणि व्यावसायिकांना  कागदी पिशव्यांचे वाटप केले.

याप्रसंगी भाजपचे युवानेते धनंजय (भैय्या) देशमुख आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.


नगरसेवक उदय देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा आदर्श

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेला सुरवात; नोंदणी प्रारंभ

कडेगाव: अतिशय उत्सुकतेने वाट पहिल्या जाणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेचे शिंग फुंकले गेले आहे. कडेगाव परिसरातील बालचमूमध्ये  प्रसिद्ध असणारी

Close