डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठी ‘खिचड्याचे’ सांगता भोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील पाटील यांच्या डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठीचे ‘खिचड्याचे’ सांगता भोजन काल रात्री संपन्न झाले.

एका शतकापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या कडेगावच्या डोल्याच्या ऐतिहासिक परंपरेमध्ये शेवटी खिचडा व डाळ-भात असा भोजनाचा बेत असतो.

एका महिन्यापेक्षा जास्त डोले बांधणी मध्ये सहभागी झालेले मानकरी आणि गगनचुंबी ताबूत उचलण्यासाठी आलेले खांदेकरी या सर्वाना एकत्रितपणे हे जेवण दिले जाते. शाकाहारी लोकांसाठी डाळ-भात तर मांसाहारी लोकांसाठी खिचडा  बनवला जातो.

या प्रसंगी, पाटील घराण्यातील गुलाम पाटील व जाफर पाटील तसेच उपनगराध्यक्ष साजिद पाटील व कुटुंबीयांनी सर्वाना धन्यवाद दिले.


3 thoughts on “डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठी ‘खिचड्याचे’ सांगता भोजन

Comments are closed.

डोल्याच्या मानकरी व खांदेकरी यांच्यासाठी ‘खिचड्याचे’ सांगता भोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
3
Read previous post:
नगरसेवक उदय देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण संरक्षणाचा आदर्श

कडेगाव: कडेगाव नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते व भाजपाचे नगरसेवक उदय देशमुख यांनी आज वाढदिवसानिमित्त कागदी व कापडी पिशव्या वाटून पर्यावरण संरक्षणाचा

Close