ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची फिनिक्स भरारी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: संपूर्ण जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोचवणारी कडेगाव तालुक्यातील  ग्रामपंचायत निवडणुक आज निकालाप्रत पोचली ज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने कौतुकास्पद  यश प्राप्त केले.

कदम आणि देशमुख या पारंपारीक प्रतिस्पर्धी गटामधील चुरशीसाठी प्रसिध्द असणाऱ्या कडेगाव व पलूस तालुक्यामध्ये नक्की कोणता पक्ष बाजी मारणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. यावर आज पडदा पडला.

गेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या पडझडीनंतर कॉंग्रेस पक्षाने पुनर्बांधणी करत ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये बाजी मारली आहे.

एकूण ४३ ग्रामपंचायतींमध्ये २८ सरपंच कॉंग्रेस पक्षाचे असून भाजपचे सरपंच उमेदवार १२ ठिकाणी विजयी झालेत.

रेणुशेवाडीमध्ये भाजप व कॉंग्रेस बिनविरोध, हणमंतवडीये इथे कॉंग्रेस व शेकाप, तर आंबेगाव इथे भाजप व कॉंग्रेस अश्या ३ ग्रामपंचायती त्या-त्या गावाअंतर्गत पक्षीय समझोत्यामधून तयार झाल्या आहेत.

आज सकाळपासूनच सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी कडेगाव इथे निवडणूक निकाल केंद्रासमोर गर्दी केली होती.

छाया: विशाल रास्कर

 

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची फिनिक्स भरारी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘मैत्र’ च्या ‘भव्य किल्ला स्पर्धे’चे किल्ला परीक्षण उद्या व परवा

  कडेगाव: परीसरामध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या मैत्र प्रतिष्ठानच्या भव्य किल्ला स्पर्धेअंतर्गत किल्ला परीक्षण उद्या व परवा (दि. १७ व १८

Close