…आणि राज्याच्या राजकारणाचे नाक पुन्हा एकदा ‘कॉंग्रेस’ चा श्वास भरू लागले0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी): सांगली सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला १११ तर राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायतीवर विजय मिळाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण मतदार राजाने कॉंग्रेसला पंसती दिल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा श्वास भरणारे ‘नाक’ समाजाला जाणारा सांगली जिल्हा बदलाच्या वाऱ्याने प्रेरीत झाल्याचे निदर्शक आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने वाळवा, शिराळा, तासगाव तालुक्यातील आपले गड राखण्यात यश मिळविले असले तरी, जत, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात तुलनेने निराशाजनक कामगिरी आहे. तरीही, समविचारी पुरोगामी पक्ष असल्याने एकूणच मतदारांचा कल उघड करणारा हा बदल आहे.

काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पिछाडीवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात १११ ग्रामपंचायती आल्या असून, ७६ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. अत्यंत चुरशीच्या पद्धतीने झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दमदार कामगिरी केलेल्या भाजपला आता मात्र ग्रामीण जनतेने झिडकारल्याचे चित्र आहे.

खानापूर तालुक्यात ४६ ग्रामपंचायतींपैकी २२ आणि आटपाडी तालुक्यात २१ पैकी १२  ग्रामपंचायतवर  शिवसेनेने भगवा फडकवून दमदार एन्ट्री केली आहे. भाजपचा मित्र पक्ष असणारी शिवसेना स्वतःची खास वोट बँक टिकवून असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे आतापर्यंत जाहीर निकाल पक्षनिहाय ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे आहेत. काही ठिकाणी कॉंग्रेसच्या इतर पक्षांबरोबर आघाड्या आहेत तर काही ठिकाणी गावकऱ्यानी एकत्रित येवून ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे.  :

 • आटपाडी: २१ पैकी १२  ग्रामपंचायतवर  शिवसेनेने भगवा फडकवाला , भाजप ७, अन्य २
 • वाळवा : ५० ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी : ३७,भाजप आणि सदाभाऊ खोत आघाडी ६, काँग्रेस १, अन्य ६
 • शिराळा: २७ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी १९, भाजप ७, कॉँग्रेस १
 • कडेगाव: ४३ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ३१, भाजप १२
 • पलूस: १४ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस ११, भाजप ४, राष्ट्रवादी १
 • तासगाव: २६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी १०
 • जत: ६१ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, काँग्रेस ३३, राष्ट्रवादी २, अन्य १०
 • कवठेमहांकाळ: २७ पैकी भाजप ८, काँग्रेस ३, राष्ट्रवादी ४, शिवसेना १, अजितराव घोरपडे आघाडी ११
 • खानापूर: ४५ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेस २४, शिवसेना २१, अन्य १०
 • शिराळा: ४६ ग्रामपंचायतींपैकी भाजप १६, राष्ट्रवादी २२ आणि काँग्रेस ८
 • सांगली जिल्हा: काँग्रेस १११, राष्ट्रवादी ७६, भाजप ६२, शिवसेना ३४, अन्य ३७

देशात सर्वत्र स्मार्ट सिटीचा गाजावाजा सुरु असताना शुगर बेल्ट मधला ग्रामीण मतदाराने भाजपाकडे पाठ फिरवणे हे नक्की कोणत्या धोरणात्मक अपयशाचे प्रतीक आहे याविषयी जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.  एकूणच, कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्षामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीनंतर चैतन्य आल्याचे दिसत आहे.

 

छाया: विशाल रास्कर


…आणि राज्याच्या राजकारणाचे नाक पुन्हा एकदा ‘कॉंग्रेस’ चा श्वास भरू लागले

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची फिनिक्स भरारी

कडेगाव: संपूर्ण जिल्ह्याची उत्सुकता शिगेला पोचवणारी कडेगाव तालुक्यातील  ग्रामपंचायत निवडणुक आज निकालाप्रत पोचली ज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाने कौतुकास्पद  यश प्राप्त केले.

Close