‘मैत्र’च्या भव्य किल्ला स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता शिगेला0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: मैत्र प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले आहे.

गेले दोन दिवस ‘मैत्र’ च्या परीक्षकांची टिम नोंदणी केलेल्या स्पर्धकांच्या किल्ल्यांची पाहणी करून तसेच मुलाखत घेत होती.

स्पर्धकांची संख्या मोठी असल्याने दोन परीक्षकांचे गट परीक्षण करत होते.

कडेगाव परिसरातील बालचमूमध्ये प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा यावर्षीही नावाप्रमाणेच भव्य आहे.

या स्पर्धेसाठीचे पहिले पारितोषिक ३३३३ रुपये आहे. तर द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे २२२२ रुपये व ११११ रुपये आहे. चौथ्या क्रमांकासाठी ७७७ रुपये तर पाचव्या क्रमांकासाठी ५५५ रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

वरील मुख्य बक्षिसांबरोबरच कै. पांडुरंग गोविंद डांगे यांचे स्मरणार्थ ट्रॉफी तसेच विजेत्या स्पर्धकांना मा. जमीर लेंगरेकर (उपायुक्त, पनवेल महानगरपालिका) यांचेतर्फे पुस्तक संच भेट दिला जाणार आहे.

पारितोषिक वितरण २२ ऑक्टोबर रोजी श्री. दत्त मंगल कार्यालय, कडेगाव  इथे केले जाणार आहे.

छाया : विशाल रास्कर

 


‘मैत्र’च्या भव्य किल्ला स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता शिगेला

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगावच्या ऐतिहासिक म. गा. विद्यालयामध्ये उद्या (२० ऑक्टो.) माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

कडेगाव:  इथल्या ऐतिहासिक महात्मा गांधी  विद्यालय व श्रीरंग नामदेव कदम जुनियर कॉलेजमध्ये उद्या (२० ऑक्टो.) रोजी माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन

Close