एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मूळ व्यथा अजूनही दुर्लक्षित; नव्या वेतन आयोगाची मागणी योग्यच !0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: महाराष्ट्राच्या विकासाची रक्तवाहिनी समजली जाणारी एस. टी. सध्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीत पुकारलेल्या संपामुळे चर्चेत आहे. या संदर्भात सरकार कडून अजूनही ठोस पाउले उचलण्यात आली नसल्याने अजून काही दिवस मराठी जनतेला दळण-वळण करताना त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट आहे. या संदर्भात जनतेने व सरकारने एस. टी. कर्मचाऱ्यांच्या सर्व व्यथा समजून घेऊन संपाला सहकार्य करावे, अशी भावना कर्मचारी संघटनांनी व्यक्त केली आहे.

इतर प्रशासकीय सेवांच्या तुलनेने अत्यंत आवश्यक सेवा असूनही एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, अशी भावना बहुतेक संपकरी जनतेच्या मनात आहे. तब्बल ८ ते १२ तास खडतर ड्युटी करणारे कर्मचारी असेल त्या सुविधामध्ये जनतेचे हित समोर ठेवून निष्ठेने काम करत आहेत, बऱ्याच कार्यशाळांच्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे. त्याचबरोबर, पिण्याचे स्वच्छ पाणी, चालक-वाहकांसाठी जेवणाच्या व नाश्त्याच्या सुविधा, विश्रांतीसाठी खोल्या यांची नितांत आवश्यकता असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

सुविधांचा अभाव व प्रवाशांची वाढती संख्या या गदारोळात बहुतेक चालक-वाहक ताण सहन करत असतात व याचा निश्चित परीणाम त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होत असतो. परंतु, अत्यल्प मेडिकल भत्ता असल्याने पुरेशी आरोग्य सुविधा मिळत नसते. अत्यंत कमी रात्रवस्ती भत्ता असल्याने कर्मचारी किमान आवश्यक साधे जेवणसुद्धा खरेदी करू शकत नाहीत, अशी वस्तुस्थिती कर्मचारी वर्गाने मांडली आहे.

वाढत्या महागाईच्या घेऱ्यात बहुतेक एस. टी. कर्मचारी कर्जबाजारी झाले असून नवीन वेतान आयोगानुसार पगार व सुविधा मिळाल्याखेरीज एस. टी. चा कर्मचारी उभा राहूच शकणार नाही, अशी व्यथा कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’ शी बोलताना मांडली.

या सर्व प्रश्नामध्ये मा. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी बहुतेक संघटनांची इच्छा आहे. या संदर्भात मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मूळ व्यथा अजूनही दुर्लक्षित; नव्या वेतन आयोगाची मागणी योग्यच !

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
…आणि राज्याच्या राजकारणाचे नाक पुन्हा एकदा ‘कॉंग्रेस’ चा श्वास भरू लागले

सांगली (विठ्ठल धर्माधिकारी): सांगली सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला १११ तर राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायतीवर विजय मिळाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण मतदार राजाने

Close