काँ. शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ‘आडम मास्तरांना’; रविवारी पलूसमध्ये सोहळा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस:  काँ. बळवंतराव शिरतोडे राज्यस्तरीय श्रमप्रतिष्ठा पुरस्कार यंदा सोलापूरचे माजी आमदार, कामगार नेते काँ. नरसय्या आडम (मास्तर) यांना जाहीर झाला आहे.

पलूस येथे उद्या (२२ ऑक्टोबर) हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा संग्राम लाँन्स, MIDC रोड, पलूस इथे रविवारी ठीक १० वाजता होणार आहे.

अत्यंत मानाचा समजला जाणारा हा राजस्तरीय पुरस्कार असून यंदा कामगारांचे लाडके पुढारी व चळवळीतील विचारवंत कॉ. आडम यांना देण्यात येत आहे.

आडम यांचे सोलापूरमधील गिरणी कामगारांच्या अधिकार आणि आर्थिक पुनरुज्जीवन यासंदर्भातील योगदान सर्वज्ञात आहे.

सध्याची आर्थिक परिस्थिती व सामाजिक चळवळींची पायमल्ली या धर्तीवर कॉ. आडम कोणते भाष्य करतात याविषयी मीडिया व जनतेला उत्सुकता आहे.

छाया सौजन्य: ए बी पी माझा


One thought on “काँ. शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ‘आडम मास्तरांना’; रविवारी पलूसमध्ये सोहळा

Comments are closed.

काँ. शिरतोडे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार ‘आडम मास्तरांना’; रविवारी पलूसमध्ये सोहळा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
‘मैत्र’च्या भव्य किल्ला स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता शिगेला

कडेगाव: मैत्र प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेचे परीक्षण पूर्ण झाले आहे. गेले दोन दिवस 'मैत्र' च्या परीक्षकांची

Close