‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ कडेगाव व पलूसच्या सौंदर्यात भर टाकेल: संग्रामसिंह देशमुख0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कडेगाव व पलूस तालुका विकासाच्या नव्या दिशेने प्रवास करत असून या शहरीकरण प्रक्रियेमध्ये ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ आपल्या कामातून तालुक्याच्या सौंदर्यात भर टाकेल, असा विश्वास सांगली जि प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. कडेगाव इथे ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’  या कन्स्ट्रक्शन् प्लॅनिंग व कन्सलटन्सीच्या कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

 

या प्रसंगी देशमुख यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रभावातून गावांगावातून सुरु असलेल्या शहरीकरणाच्या लाटेमध्ये  ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’  सारख्या  मार्गदर्शक व्यवस्थांची गरज असल्याचे सांगितले. या प्रसंगी त्यांनी ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ चे प्रोप्रायटर इंजिनियर निकेतन कांबळे व कुटुंबियांना नव्या ऑफिसच्या उद्घाटनानिम्मित शुभेच्छा दिल्या.

सांगली जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी निकेतन कांबळे यांना शुभेच्छा देताना आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, सुशिक्षित इंजिनियरनी शहरी भागाकडे जाण्याचा ट्रेंड असतानाही निकेतन कांबळे यांनी  ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’च्या माध्यमातून भागामध्ये अत्यंत आधुनिक सुविधा देण्याच्या घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे.

मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सतीशराव देशमुख आणि पुण्याचे युवा उद्योजक संदीप साखरे यांनी  निकेतन कांबळे व कुटुंबियांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी भाजपचे अनेक ज्येष्ठ व युवा नेते  उपस्थित होते.

‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ च्या स्थापनेबाबत बोलताना इंजिनियर निकेतन कांबळे यांनी सांगितले की वास्तू बांधताना ती आजूबाजूच्या सौंदर्यात भर घालणारी असावी, या मुख्य उद्देशाने आमची संस्था सेवा पुरवते. अत्यंत दर्जेदार डीजाइन्स आणि बांधकाम तंत्रज्ञान याबरोबरच वास्तुशास्त्र व फेंग शुई अश्या पारंपरिक वस्तू ज्ञानाचा पुरेपूर वापर करून ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’  कडेगाव व पलूस परीसरामध्ये अभिनव प्रकारची वास्तू संस्कृती तयार करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नानासाहेब ज्ञानदेव कांबळे (गुरुजी) व कुटुंबीयांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. ADVT

‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’ कडेगाव व पलूसच्या सौंदर्यात भर टाकेल: संग्रामसिंह देशमुख

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
लिंगायत धर्म महामोर्चाची पूर्वतयारी बैठक उद्या (२२ ऑक्टो.) सांगलीमध्ये

सांगली: 'स्वतंत्र लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा मिळणे' या प्रमुख मागणीला धरून सुरु असलेला लिंगायत धर्म महामोर्चा लातूर नंतर आता सांगली

Close