लिंगायत धर्म महामोर्चाची पूर्वतयारी बैठक उद्या (२२ ऑक्टो.) सांगलीमध्ये0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

सांगली: ‘स्वतंत्र लिंगायत धर्मास अल्पसंख्यांक दर्जा मिळणे’ या प्रमुख मागणीला धरून सुरु असलेला लिंगायत धर्म महामोर्चा लातूर नंतर आता सांगली येथे ३ डिसेंबरला होणार आहे.  या महामोर्चाच्या तयारीसाठी बैठकीचे आयोजन उद्या २२ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

सांगलीच्या लिंगायत बोर्डिंग इथे  सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती तर्फे देण्यात आली आहे.

या मिटींगसाठी सर्व लिंगायत धर्मियांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती 9423037482 व 9822408111 या नंबरवर घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

कर्नाटकातील लिंगायत महामोर्चानंतर महाराष्ट्रातल्या लातूर येथे काही दिवसापूर्वी महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते त्यास सुमारे ७ लाख पेक्षा जास्त लिंगायत धर्मीयांची उपस्थिती होती.

छाया सौजन्य: डेक्कन हेराल्ड


लिंगायत धर्म महामोर्चाची पूर्वतयारी बैठक उद्या (२२ ऑक्टो.) सांगलीमध्ये

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तमाम भिकारी बंधू-भगिनींना दिवाळीच्या ‘विशेष’ शुभेच्छा…!!! (विशेष संपादकीय)

वेळप्रसंगी लेपंचेपं का हुईना पण मध्यमवर्गीय शहरी जनतेला सतत केंद्रस्थानी ठेवून दिवाळी, गुंतवणूक, विमा, झालंच तर एक किंवा दोन बीएचके

Close