सौरभचा ‘सिंधुदुर्ग’ ‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेत ठरला अभेद्य…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव:  शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या मैत्र प्रतिष्ठान अयोजीत ‘ भव्य किल्ला स्पर्धा २०१७’ चे निकाल आज जाहीर झाले.

यामध्ये सौरभ कदम या बालकिल्लेदाराचा  सिंधुदुर्ग किल्ला विजयी ठरला.  सौरभला विजेतेपदाचे पारितोषिक अभिमन्यू वरुडे व तेजस्विनी गलांडे यांचे हस्ते देण्यात आले.

स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवला तो आस्मित अशोक शिंदे  या किल्लेदाराच्या पन्हाळगडाला. त्याचे अभिनंदन केले ते प्रकाश गायकवाड व नगराध्यक्षा आकांक्षाताई जाधव यांनी.

तिसऱ्या क्रमांकाचे परितोषिक देण्यात आले चि. चैतन शरद सूर्यवंशीला. त्याच्या प्रतापगडच्या किल्ल्याने ‘मैत्र’ च्या  परीक्षक मंडळींचे मन मोहून टाकले होते. चैतनचा सत्कार कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  पुजारी यांनी केला.

किल्ला स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांक चि. मयूर अर्जुन डांगे याला मिळाला. त्याच्या रायगडच्या किल्ला प्रतिकृतीबद्दल त्याच्या सत्कार जगन्नाथ तातोबा नायकवडी व शिक्षक वर्गाने केला.

पाचवा क्रमांक  शिवबा ग्रुपच्या  जंजीराला मिळाला.  गुरुवर्य वी पी पवार सर यांनी शिवबा ग्रुपच्या शिलेदारांचे अभिनंदन केले.

येथील शिवाजी चौकातील दत्त मंगल कार्यालय इथे भव्य समारंभात बक्षीस वितरण पार पडले.


सौरभचा ‘सिंधुदुर्ग’ ‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेत ठरला अभेद्य…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
आत्मविश्वास कसा वाढवावा? (निमंत्रित लेख)

  ‘आत्मविश्वास’ हा शब्द बहुतेक सर्वांनी ऐकलेला आहे. व्यक्तीमत्वाचा, किंबहुना त्याहीपेक्षा व्यक्तीत्वाचा एक प्रमुख घटक म्हणून आत्मविश्वास महत्वाचा समजला जातो.

Close