सांगली लिंगायत महामोर्च्याची तालुका नियोजन बैठक उद्या कडेगावमध्ये0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सांगली येथे ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची तालुका-स्तरीय बैठक उद्या कडेगाव इथे आयोजित करण्यात आली आहे.

कडेगाव येथील महादेव मंदिरात दुपारी ३ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

‘लिंगायत धर्मास स्वतंत्र घटनात्मक दर्जा व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा’, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती, बसव ब्रिगेड व लिंगायत धर्मियांच्या अनेक संघटनांतर्फे सांगली येथे ३ डिसेंबरला या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीमध्ये श. अविनाश भोसीकर, श. प्रदीप वाले सर, श. विश्वनाथ मिरजकर, श. नामदेव करगणे, श. महादेव चिवटे, व श. राजेंद्र कुंभार मार्गदर्शन करणार आहेत.

३ डिसेंबरच्या सांगली येथील मोर्च्यासाठी नियोजन करण्यासाठी कडेगाव तालुक्यातील सर्व लिंगायत बंधू – भगिनींनी दुपारी ३ वाजता एकत्र यावे, असे आवाहन बसव ब्रिगेडचे तालुका प्रमुख शरण संदीप माळी यांनी केले आहे.

कडेगाव तालुक्यातील सर्व लिंगायत धर्मियांनी मोर्च्यात सहभागी होण्यासाठी सक्रीय व्हावे, असे आवाहन बसव ब्रिगेड तर्फे करण्यात आले आहे.


सांगली लिंगायत महामोर्च्याची तालुका नियोजन बैठक उद्या कडेगावमध्ये

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सौरभचा ‘सिंधुदुर्ग’ ‘मैत्र’च्या किल्ला स्पर्धेत ठरला अभेद्य…!!!

कडेगाव:  शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या मैत्र प्रतिष्ठान अयोजीत ' भव्य किल्ला स्पर्धा २०१७' चे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये सौरभ

Close