​कडेगावच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मधील डिजिटल क्रांतीची शोकांतिका…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर डिजिटल क्रांतीसाठी भलेही स्वतःची पाठ थोपटून घेणारे सरकारी अधिकारी असले तरीही संस्थात्मक पातळीवर डिजिटल क्रांतीची शोकांतिका सध्या अत्यंत केविलवाण्या अवस्थेत आहे.  याचा प्रत्यक्ष अनुभव आज ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’चे मुख्य संपादक डॉ. गोविंद धस्के यांना आला.

येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कडेगाव-पलूस लाईव न्यूज या वेब न्यूज मिडिया पोर्टलसाठी अर्थपुरवठ्यासंबंधी चौकशीसाठी गेलेल्या संपादकांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाने ‘वेब न्यूज मिडिया’ या प्रकाराविषयी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्याहीपुढे बातम्यांच्या वेबसाईट घरातून चालवल्या जातात आणि त्याला कर्जपुरवठ्याची आवश्यकता लागत नाही अशी भयंकर माहिती पुरविली.

व्यवस्थापकाने सगळ्यात मोठा कहर केला जेव्हा त्याने एका रिटायरमेंटला आलेल्या कर्मचाऱ्याला बोलवून ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज पता है क्या?’ असे विचारले. कर्मचारी सुद्धा ‘कधी नाव ऐकलेलं नाही’, अस अगदी प्रामाणिकपणे म्हणाला आणि पूर्ण शहानिशा झाल्यासारखे व्यवस्थापकाने पुन्हा आपल्या डिजिटल क्रांतीविषयीच्या ज्ञानाचे प्रदर्शन केले. वेबमिडिया आणि मोठ्या प्रमाणात स्टार्टअपसला फंड करण्याचे सरकारचे धोरण असताना बँकेतील कर्मचाऱ्यांना आणि व्यवस्थापकाला ज्या शहरात पत पुरवठा करायची जबाबदारी आहे त्या शहरातील बातम्यांची वेबसाईट माहित नव्हती तरीही त्याचे अकलेचे तारे तोडणे सुरु होतेच. वेब मिडिया समजून देण्याचा संपादकानी पूर्ण प्रयत्न केला तर व्यवस्थापकाने अजिबात ऐकून घेतले नाही आणि स्वतःच्या थियरी फेकत राहिला.

परीसरामध्ये लोकप्रिय असणाऱ्या बातम्यांची वेबसाईट माहित नसणारे आणि वेब मिडिया न्यूज चॅनेल या प्रकाराविषयी अज्ञान आणि पूर्वग्रह असणारे बँक व्यवस्थापक कश्या प्रकारे कर्जपुरवठा करणार, ही मोठी शंका इथे आहेच.  पण, स्वतःच्या अकेलेचे तारे तोडणे थांबवून स्वतःला नवनवीन माहिती-तंत्रज्ञानावर आधारीत गोष्टी पहिल्यांदा समजून घेवून मग ग्राहकांशी बोलणे आवश्यक असताना जबाबदार बँक अधिकारी आपले सामान्य अज्ञान वापरून सुशिक्षित व्यक्तींना सुद्धा स्वतःला माहित नसलेल्या विषयावर अक्कल शिकवण्याचा बेजबाबदार प्रयत्न करत राहणार काय?, हा मुख्य प्रश्न अनुत्तरीत आहे. त्याहीपेक्षा सरकारी बँका जर कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांच्या उद्योगांची शहानिशा एका कर्मचाऱ्याला विचारून करत असतील तर ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या माहिती-तंत्रज्ञान आधारित उद्योगांसाठी पतपुरवठ्याची अवस्था भूतकाळाप्रमाणेच राहणार यात शंका नाही.

त्याहीपेक्षा मोठे दुर्दैव हेच आहे की डिजिटल पेमेंट व तत्सम संगणकीय सेवा देणे हा प्रकार सरकारी पातळीवर धोरण म्हणून घेण्यात आला असला तरी अजूनही संस्थात्मक पातळीवर तालुक्याच्या ठिकाणी प्रसिद्ध सरकारी बँकेचे व्यवस्थापक असणाऱ्या व्यक्तीला वेब मिडिया व न्यूज पोर्टल ची शहानिशा स्वताच्याच बँकेतल्या एका साध्या कर्मचाऱ्याला विचारून करायची वैज्ञानिक पद्धत सरकारच्या डिजिटल क्रांतीची शोकांतिका ठळक करत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या डिजिटल क्रांतीचा उदो उदो करणारे याची दखल घेतली का?


​कडेगावच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मधील डिजिटल क्रांतीची शोकांतिका…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मागण्या मान्य झाल्याशिवाय लिंगायत थांबणार नाहीत : कडेगावच्या बैठकीत निर्धार

कडेगाव: येथील ‘बसव ब्रिगेड’ च्या तालुका व शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज कडेगाव तालुकास्तरीय नियोजन बैठक पार पडली. सांगली येथे ३

Close