मागण्या मान्य झाल्याशिवाय लिंगायत थांबणार नाहीत : कडेगावच्या बैठकीत निर्धार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील ‘बसव ब्रिगेड’ च्या तालुका व शहर शाखेच्या नेतृत्वाखाली आज कडेगाव तालुकास्तरीय नियोजन बैठक पार पडली. सांगली येथे ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या लिंगायत महामोर्च्याच्या नियोजन व पूर्वतयारीसाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी प्रदीप वाले, नामदेव करगणे, नानासो मेनकुदळे, विश्वनाथ मिरजकर, महादेव चिवटे आणि विठ्ठल तोडकर यांनी या बैठकीमध्ये लिंगायत महामोर्च्यामागची भूमिका व उद्देश स्पष्ट केले.

बसव ब्रिगेड च्या तालुका शाखेचे प्रमुख संदीप माळी यांनी प्रास्ताविक केले व बसव ब्रिगेडच्या कार्याविषयी आणि तालुक्यातील लिंगायत धर्मियांच्या प्रश्नांविषयी माहिती दिली. या प्रसंगी कडेगाव व परीसरातील लिंगायत धर्मातील अनेक प्रतिष्ठित व्यापारी, शेतकरी, उद्योजक आणि राजकीय नेते, आणि लिंगायत समाज मंडळी उपस्थित होती. यामध्ये युवकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय संख्या होती.

ब्रिटीशकाळापर्यंत सरकार दरबारी स्वतंत्र धर्म म्हणून नोंद असणाऱ्या लिंगायत धर्माचा अनुल्लेख खोडसाळपणे कावा करून बदलण्यात आल्याने लिंगायत जातींची सर्व स्तरावर दुरावस्था झाली आहे. फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवरच नव्हे तर अनेक आर्थिक संकटाना तोंड देत लिंगायत धर्म आणि समाज टिकून आहेत. यातून बाहेर निघण्यासाठी आधीच्या चुका दुरुस्त करून लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म आणि अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी सांगलीच्या महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नियोजन समितीतर्फे देण्यात आली.

या प्रसंगी बसव ब्रिगेडचे तालुका संपर्क प्रमुख दिपक कोकणे, शहर अध्यक्ष व समाजसेवक हर्शल वाघिरे, शहर शाखेचे सचिव अधिक तडसरे यांनी कडेगाव तालुक्यातील नियोजनासंबंधी सविस्तर आराखडा मांडला. सर्व जाती-धर्म आणि राजकीय पक्षांना एकत्र घेऊन स्वतंत्र लिंगायत धर्माचे आंदोलन यश मिळेपर्यंत सुरु राहणार आहे आणि यामध्ये कडेगाव तालुक्यातील लिंगायत ऐतिहासिक योगदान देईल अशी ग्वाही बसव ब्रिगेडच्या तरुण पदाधिकारी मंडळीनी दिली.

युवा उद्योजक अभिजित तडसरे यांनी कडेगावमधील लिंगायत समाजातील तरुणांच्या कार्यास ज्येष्ठांनी सतत सक्रीय पाठींबा व मार्गदर्शन देण्याची आवश्यकता व्यक्त केली व सर्व उपस्थितांचे व लिंगायत समन्वय समितीच्या मार्गदर्शकांचे आभार मांडले.


मागण्या मान्य झाल्याशिवाय लिंगायत थांबणार नाहीत : कडेगावच्या बैठकीत निर्धार

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सांगली लिंगायत महामोर्च्याची तालुका नियोजन बैठक उद्या कडेगावमध्ये

कडेगाव: सांगली येथे ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चाची तालुका-स्तरीय बैठक उद्या कडेगाव इथे आयोजित करण्यात आली आहे. कडेगाव येथील महादेव

Close