राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: नुकत्याच मुंबई मध्ये झालेल्या राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये कु. आर्या शालिवान लोखंडे हिने दुसरा क्रमांक मिळवला. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे ही स्पर्धा पार पडली.

मूळची कडेगावकर आर्या सध्या कऱ्हाडच्या होली फॅमिली कॉन्व्हेंट मध्ये शिकत आहे.

आर्या यापूर्वी अबॅकस स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर तृतीय क्रमांक मिळविला आहे. मुंबई इथल्या स्पर्धेमध्ये तिने ८-१२ या वयोगटामध्ये यश मिळवले.

या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तयारीसाठी तिला तिची आई सौ. रुपाली शालिवान लोखंडे व वडील प्राध्यापक शालिवान भालचंद्र लोखंडे तसेच शाळेतील शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले.

आर्याच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 


One thought on “राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी

Comments are closed.

राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
इंग्लीश बोलायला शिकवणारा हुकमी ‘क्लास’ कसा निवडावा? (निमंत्रित लेख)

व्यावसायिक प्रगतीसाठी, नोकरीमध्ये यश मिळवण्यासाठी, शिक्षणासाठी अनेक जण अनेक वेळा अनेक प्रकारचे इंग्लीश बोलण्यासाठीचे क्लासेस लावतात आणि शक्य तितक्या वेगात

Close