कॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: पुरोगामी शिक्षक संघटनेचे संस्थापक कॉ. पी.डी. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन ‘पुरोगामी’ या स्मृतिविशेषांकाचे प्रकाशन करुन व ‘बहुजनांचे शिक्षण वाचवा’ या परिसंवादाचे आयोजन करून साजरा झाला. पारंपरिक पध्दतीला फाटा देत दिलेल्या श्रद्धांजलीला पुरोगामी चळवळीतील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कलंबी ता. खानापूर जिल्हा सांगली येथील महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीतील महान नेतृत्व, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे संस्थापक कॉ. पी. डी. कदम  गुरुजी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमीत्त पारंपरिक पद्धतीला फाटा देणेत आला. पी. डी. दादांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या विशेषांकाचे प्रकाशन जेष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते करणेत आले.

विशेषांकाचे संपादन पुरोगामी शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी केले आहे. याप्रसंगी ‘बहुजनांचे शिक्षण वाचवा’ या विषयावर झालेल्या परिसंवादात विद्रोही संस्कृतिक चळवळीचे नेते प्रा. डॉ. बाबुराव गुरव,प्राचार्य विश्वास सायनाकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे नेते शंकरराव पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. रमेश सहस्रबुद्धे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई अजित सुर्यवंशी, लोकशाही वाचवा कृतिशील विचारमंच चे अध्यक्ष डॉ.अमोल पवार, यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे स्वागत दिलीप सव्वाशे यांनी केले, प्रास्ताविक मारुती शिरतोडे यांनी केले तर आभार योगेश कदम यांनी मानले. कार्यक्रमास आमदार मोहनराव कदम, माजी आमदार सदाशिवराव पाटील, मारुती सावंत शिरगावकर, अनिल मोहिते, सदाशिव वाले, पांडुरंग शितोळे, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू  सुभाष पाटील, सर्जेराव जगताप, यांचेसह शेकडोची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन योगेश कदम, उत्कर्ष कदम, विकास कदम, बालाजी कदम, सर्जेराव कदम, दत्तात्रय मानुगडे यांनी केले.

One thought on “कॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार

Comments are closed.

कॉ. कदम गुरुजी यांचा प्रथम स्मृतिदिन: पुरोगामी चळवळीचा बहुजन शिक्षण वाचवण्याचा निर्धार

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये आर्या लोखंडे दुसरी

कडेगाव: नुकत्याच मुंबई मध्ये झालेल्या राज्य पातळीवरील अबॅकस स्पर्धेमध्ये कु. आर्या शालिवान लोखंडे हिने दुसरा क्रमांक मिळवला. मुंबई येथील वर्ल्ड

Close