विद्यार्थी दिवसानिम्मित ‘सेल्फहूड’ तर्फे येत्या शनिवारी मोफत समुपदेशन शिबीराचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव:  ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिवसा’च्या अनुषंगाने ‘सेल्फहूड’ तर्फे येत्या शनिवारी व रविवारी (११ व १२ नोव्हेंबर रोजी ) मोफत समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे समुपदेशन शिबीर येत्या शनिवारी व रविवारी सेल्फहूडच्या कडेगाव येथील कार्यालयात दुपारी १२ ते ४:३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

या मोफत शिबिरामध्ये शालेय व कॉलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व उद्योजकांना खालील विषयावर मोफत समुपदेशन देण्यात येणार आहे:

  • करीयर समस्या जसेकी कोणता अभ्यासक्रम निवडावा वगेरे
  • अभ्यासविषयक समस्या जसेकी लक्ष कमी असणे, अभ्यासात मन न लागणे इत्यादी
  • पालकत्वामधील समस्या जसेकी मुलांशी संवाद साधता न येणे, मुलांच्या वर्तन समस्या इत्यादी
  • व्यावसायिक व उद्योजकांच्या विकासविषयक समस्या
  • शिक्षकांच्या शिकवणे, लेखन, वर्ग ताब्यात ठेवता न येणे, इंग्लिश संभाषण करता न येणे, आदर्श शिक्षक बनण्यासाठीचे मार्गदर्शन, शैक्षणिक नेतृत्व, आदर्श शाळा निर्मिती  व इतर कौशल्यासंबंधीच्या समस्या
  • विवाहित जोडप्याना मार्गदर्शन

वरील मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी  इच्छुकांनी खालील फोन नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन ‘सेल्फहूड’ तर्फे करण्यात आले आहे:

सेल्फहूड : ९४२०८६५७५९

श्री. दिपकराज कोकणे : ८५५२८६७०००

श्री. हर्शल वाघिरे: ९५५२७९२८०४

प्रा. तुषार शेटे: ९०२८९३३२१२

पूर्वनोंदणी केलेल्या लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल. वरील मोफत शिबिराविषयी आपल्या परिसरातील गरजू मुले, तरुण, जोडपी, पालक, शिक्षक, उद्योजक इत्यादींना सामाजिक कार्यकर्ते व जबाबदार नागरीक यांनी माहिती द्यावी असे आवाहन ‘सेल्फहूड’तर्फे करण्यात आले आहे.

शिबीरस्थळ : सेल्फहूड, शोभाश्री बिल्डींग, बसस्थानकाच्या डाव्या बाजूला, कडेगाव-४१५३०४, जि. सांगलीOne thought on “विद्यार्थी दिवसानिम्मित ‘सेल्फहूड’ तर्फे येत्या शनिवारी मोफत समुपदेशन शिबीराचे आयोजन

Comments are closed.

विद्यार्थी दिवसानिम्मित ‘सेल्फहूड’ तर्फे येत्या शनिवारी मोफत समुपदेशन शिबीराचे आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
न्यू सेकंडरी स्कूल, नेर्लीमध्ये “विद्यार्थी दिन” उत्साहात साजरा

नेर्ली : शासन निर्णयानुसार ७ नोव्हेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेशदिनानिमित्त यावर्षीपासून शासनाने विद्यार्थी दीन साजरा करण्याचे परिपत्रक

Close