‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या कोर्सेस साठीच्या परीक्षा यामध्ये मुलाखत हा एक आवश्यक भाग बनला आहे. या संदर्भात कडेगाव व परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी येथील ‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ इथे ‘मुलाखतीमधे यशस्वी होण्याचे तंत्र आणि मंत्र’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा येत्या शनिवारी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी  दुपारी ३ ते ६ या वेळेत पार पडेल. सर्व शालेय व कॉलेजवयीन विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे, सुशिक्षित रोजगार आणि बेरोजगार, युवा राजकीय कार्यकर्ते आणि नेते, उद्योजक, शिक्षक यांना ही कार्यशाळा उपयुक्त आहे.

लेखी परीक्षेकडे पूर्ण लक्ष दिल्याने मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन या बहुतेक प्रशासकीय परीक्षा आणि व्यावसायिक कोर्सेस व नोकरी या आवश्यक असणाऱ्या घटकांकडे दुर्लक्ष होते. याचे परीणाम मग परीक्षांमधल्या यशावर होतो. विद्यार्थ्यांनी संतुलितपणे अभ्यास करत सर्व प्रकारच्या क्षमता स्वतःमध्ये विकसित करणे आवश्यक आहे, असे मत ‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’च्या चेतन सावंत व कौशल धर्मे यांनी व्यक्त केले.

‘सेल्फहूड’ या प्रकल्पातर्फे घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेमध्ये डॉ. गोविंद धस्के आणि सौ. अनामिका धस्के हे प्रथितयश संवाद तंत्र अभ्यासक व संशोधक मार्गदर्शन करतील.

या कार्यशाळेसाठी नावनोंदनिची अंतिम तारीख शुक्रवार १७ नोव्हेंबर संध्याकाळी ५ पर्यंत आहे. त्यांनतर प्रवेश उपलब्ध नसेल.


‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
शिरसगाव इथे बिरोबा मंदिराच्या कामास शुभारंभ

शिरसगाव: येथील बिरोबा मंदिराच्या कामाचा वनश्री मोहनराव कदम यांचे हस्ते शुभारंभ झाला. या प्रसंगी आमदार कदम यांनी गावाने एकसंध राहावे

Close