शिरसगाव इथे बिरोबा मंदिराच्या कामास शुभारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

शिरसगाव: येथील बिरोबा मंदिराच्या कामाचा वनश्री मोहनराव कदम यांचे हस्ते शुभारंभ झाला. या प्रसंगी आमदार कदम यांनी गावाने एकसंध राहावे व पर्यावरण संवर्धनाच्या कामास पुढे घेऊन जावे, असे सांगितले. बिरोबा मंदिराच्या कामास सर्वांनी मोलाचे सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी संभाजी मुळीक (मार्केट कमिटी संचालक), विठ्ठल मुळीक (माजी पंचायत समिती उपसभापती), सुरेश मुळीक (ग्रामपंचायत सदस्य, शाळगाव), गणेश कदम (सरपंच, सोनसळ) व मोठ्या प्रमाणावर शिरसगाव व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

रामभाऊ घुटूकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच आभार मांडले.

मौजे शिरसगाव येथील बिरोबा मंदिराचे काम लोकवर्गणीतून होत असून सभा मंडपाच्या कामासाठी देणगीतून काम करण्याचे नियोजन आहे.


 

शिरसगाव इथे बिरोबा मंदिराच्या कामास शुभारंभ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव-पलूस मधलं तरुण क्रांतीबीज-आकाश सातपुते, सांगली जिल्हाध्यक्ष-राष्ट्रीय समाज पक्ष

आकाश जगन्नाथ सातपुते, चिंचणी (अं) या कडेगांव तालुक्यातल्या एका विकासोन्मुख गावातलं अनोखं तरुण व्यक्तिमत्व. एरव्ही सामाजिक आंदोलने व कृती यामुळे

Close