चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यासमोर पक्षीय निषेध मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

रामापूर: सामाजिक कार्यकर्ते दिपक दिनकर पाटील यांना राजकीय दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप करत, काल चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रीय समाज पक्ष, आर. पी. आय., श्रमिक मुक्ती दल., आदि पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाचे नेत्रुत्व आर. पी. आय. चे तालुकाध्यक्ष महादेव होवाळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांनी केले.

यावेळी ख्यातनाम वकील सुभाष पाटिल, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते, आर. पी. आय.चे तालुकाध्यक्ष महादेव होवाळ, श्रमिक मुक्ती दलाचे मोहनराव यादव, परशुराम माळी, जिवन करकटे उपस्थितीत होते.

सुभाष पाटील, आकाश सातपुते, महादेव होवाळ, मोहनराव यादव, आणि  जिवन करकटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन कडेगाव पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पुजारी यांच्याकडे देण्यात आले.


चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यासमोर पक्षीय निषेध मोर्चा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘शारदा कॉम्पिटीटीव्ह फोरम’ मध्ये मुलाखत कार्यशाळेचे येत्या शनिवारी (१८ नोव्हे.) आयोजन

कडेगाव: स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या कोर्सेस साठीच्या परीक्षा यामध्ये मुलाखत हा एक आवश्यक भाग बनला आहे. या संदर्भात कडेगाव व

Close