पालकांनो सावधान : मोबाईल वरची इ-शिक्षण ऍपस मुलांना ‘मठ्ठ’ बनवत आहेत…!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: अलीकडे मोबाईलवरील ऍपच्या माध्यमातून विशेषतः गणित व विज्ञान विषयांचे शिक्षण घेण्यासाठी कल वाढला आहे. पण अशी ऍपस मुलांना शिकण्यास मदत करण्याऐवजी अधिकच  ‘मठ्ठ’ बनवत आहेत, असा निष्कर्ष अनेक संशोधनातून समोर येत असल्याची माहिती डेसमंड एन जी या प्रसिद्ध सायबर पत्रकाराने दिली आहे.

मध्यमवर्गीयच नव्हे तर अगदी सामान्य आर्थिक गटातील पालकांकडेसुद्धा स्मार्टफोन असतो आणि त्याचा वापर मुलांकडून वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. यामध्ये सुशिक्षित मध्यमवर्गीय पालक गटांमध्ये मुलांना शिकण्यासाठी व गेम खेळायला देण्यासाठी जास्त कल आहे.

अलीकडे अश्याप्रकाराची अनेक शैक्षणिक ऍप उपलब्ध झाल्याने मुले सतत मोबाईल वापरत आहेत, गेम खेळण्यासाठी आणि प्रसंगी शिकण्यासाठी.  डेसमंड एन जी यांनी दिलेल्या माहितीनुसार असे ऍप बनवणाऱ्या कंपन्या शैक्षणिक ऍप बनवताना गेम सदृश्य तंत्रज्ञान आणि पद्धती वापरत असल्यामुळे मुलांच्या गणिती कौशल्यावर विपरीत परिणाम होत आहे. पारंपारिक पद्धतीने गणित सारखे विषय शिकण्याची पद्धती मेंदूच्या क्षमता वाढवण्यास पूरक आहे, परंतु गेमचे तंत्रज्ञान वापरल्याने मुलांच्या गणितीक क्षमतांचा अल्प विकास होत असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

ऍप बनवणाऱ्या कंपन्या मुलांनी सतत त्यांचेच ऍप वापरावे व प्रत्येक वेळच्या वापराची वेळ सतत वाढत जावी अश्या धोरणाने शैक्षणिक ऍप बनवतात. त्यामुळे मुले अनावश्यकजास्त वेळ ऍपमध्ये गुंतलेली राहतात. याचा डोळ्यावर व मेंदूवर येणारा ताण अत्यंत गंभीर असतो परंतु सामान्यतः आरोग्य ज्ञानाच्या अभावामुळे आणि बदल करण्याची मानसिकता नसल्याने सुशिक्षित पालकवर्गाकडून सुद्धा यावर तोडगा काढला जात नाही.

मुलांनी सकारात्मकपणे नवीन शैक्षणिक कौशल्ये शिकणे आवश्यक असते. परंतु, ऍपच्या वापरामुळे मुले सक्रीय पद्धतीने शिकण्याएवजी निष्क्रिय पद्धतीने शिक्षण घेतात यातून त्यांच्या कार्यशीलातेवर नकारात्मक परिणाम होतो.

यासंदर्भात पालकांनी गंभीरपणे विचार करून मुलांना त्यांच्या मेंदुंच्या क्षमतांचा दीर्घकालीन विकास होईल अश्या पद्धतीची शिक्षण प्रक्रिया देणे आवश्यक असल्याचे मत, डॉ. गोविंद धस्के यांनी ‘कडेगाव-पलूस लाइव न्यूज’ शी बोलताना व्यक्त केले.

पुण्यातील बालशिक्षण समाजशास्त्रज्ञ सुमती उनकुले-त्रिभुवन यांनी कोणतेही नवे तंत्रज्ञान मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध करून देण्यापूर्वी त्याविषयी सर्व क्षेत्रातील तज्ञांचे मत घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान न तपासता वापरण्याची गुलामी मनोवृत्ती पालकांनी व शिक्षकांनी सोडण्याचे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


 

पालकांनो सावधान : मोबाईल वरची इ-शिक्षण ऍपस मुलांना ‘मठ्ठ’ बनवत आहेत…!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यासमोर पक्षीय निषेध मोर्चा

रामापूर: सामाजिक कार्यकर्ते दिपक दिनकर पाटील यांना राजकीय दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप करत, काल चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या आवारात

Close