यावर्षीच्या संविधान रत्न पुरस्काराचे मानकरी डॉ. विश्वजीत कदम, उद्या पुणे इथे समारंभ0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: युवक कॉंग्रेसची प्रदेशाध्यक्ष या नात्याने धुरा सांभाळणारे व जागतिक पातळीवरील विख्यात भारती विद्यापीठाचे कार्यवाह असणारे डॉ. विश्वजीत कदम यांना यंदाचा संविधान रत्न पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती पुणे येथील संविधान जागर राष्ट्रीय संमेलनाचे कार्याध्यक्ष सतीश देसाई यांनी दिली.

पुणे इथे उद्या (मंगळवार २१ नोव्हें.) समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या संमेलनास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, श्रीपाल सबनीस, आणि रमेश बागवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अत्यंत जबाबदार पद्धतीने राजकीय प्रश्न व विकास योजना हाताळणारे युवा नेतृत्व म्हणून डॉ. विश्वजीत कदम अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर दिल्लीतसुद्धा माहित आहेत.

डॉ. पतंगराव कदम यांच्या अभ्यासू व विकासोन्मुख राजकारणाचा वारस म्हणून त्यांना ओळखले जात असले तरी त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा महाराष्ट्रातल्या राजकारणावर उमटवला आहे. अत्यंत संयमी समजले जाणारे डॉ. विश्वजीत गरज वाटल्यास अत्यंत आक्रमक होऊन राजकीय लढाया लढू शकतात हे त्यांनी अनेक प्रसंगातून दाखवून दिले आहे.

डॉ. विश्वजीत कदम यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.  सध्याची राजकीय परिस्थिती, शेतकऱ्यांचा प्रश्न आणि गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. कदम उद्या कोणते राजकीय भाष्य करतात याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे.


 

यावर्षीच्या संविधान रत्न पुरस्काराचे मानकरी डॉ. विश्वजीत कदम, उद्या पुणे इथे समारंभ

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पालकांनो सावधान : मोबाईल वरची इ-शिक्षण ऍपस मुलांना ‘मठ्ठ’ बनवत आहेत…!

कडेगाव: अलीकडे मोबाईलवरील ऍपच्या माध्यमातून विशेषतः गणित व विज्ञान विषयांचे शिक्षण घेण्यासाठी कल वाढला आहे. पण अशी ऍपस मुलांना शिकण्यास

Close