क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

हणमंतवडीये: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी प्रसिद्ध शाहीर बजरंग अंबी यांना पांडुरंग प्रभू माळी गुरुजी ‘काव्य पुरस्कार’ देण्यात येणार आहे.

क्रांतिसिंह विश्वस्त मंडळाचे मोफत वाचनालय व मराठी साहित्य परिषद कडेगाव-खानापूर, यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि. ६ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी १:३० वाजता हणमंतवडीये येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा प्राची दुधाणे असतील अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा वाडेकर असतील.

शाहीर बजरंग अंबी यांना देण्यात येणारा पुरस्कार तडसर येथील माळी कुटुंबियांतर्फे सुरु केल्या गेलेल्या ट्रस्ट मार्फत देण्यात येतो.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहून क्रांतिकारी विचारमंथनामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कोतवडे ग्रामपंचायत कार्यकारणीची निवड; नवीन कार्यकारणीने कार्यभार स्वीकारला

कोतवडे:  ग्रामपंचायत निवडणूक संपल्यानंतरही कार्यकाल काही दिवस असल्याने नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेली नव्हती. आज कोतवडे ग्रामपंचायतीसाठी उपसरपंच निवडण्यात आले आणि

Close