स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनास रासप, बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टी व मराठा सेवा संघाचा सक्रीय पाठींबा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी घटनात्मक असून सरकारकडे लिंगायत धर्मावर झालेल्या अन्यायाला दुरुस्त करण्याची शेवटची संधी असल्याचे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते, बामसेफ तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हानेते दत्ताभाऊ नलावडे, मराठा सेवा संघाचे नेते भगवानराव पाटील (शिंदे नाना) यांनी स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनास जाहीर पाठींबा व्यक्त केला. कडेगाव तालुका बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना भेटून वरील नेत्यांनी आपल्या पक्ष व संघटनातर्फे पाठिंब्याचे पत्र दिले.

आंदोलनासंबंधी मत व्यक्त करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नेते दत्ताभाऊ नलावडे म्हणाले की लिंगायत समाजास गेली अनेक दशके सामाजिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आले असून स्वतंत्र धार्मिक तसेच अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्याने मूलनिवासी लिंगायत जातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात ताकदीने सामील होता येईल व मनुवादी व्यवस्थेच्या अन्यायातून बाहेर पडता येईल.

मराठा सेवा संघाचे नेते भगवानराव पाटील (शिंदेंनाना) यांनी बसव ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनाची लढाई लोकशाही मार्गाने न्याय मिळेपर्यंत सुरु ठेवण्याचा सल्ला दिला व आंदोलनास जाहीर पाठींबा व्यक्त केला.

लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी तसेच अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या दोन प्रमुख मागण्यांसाठी सध्या देश पातळीवर लिंगायत धर्मीयांतर्फे प्रखर आंदोलन व निदर्शने सुरू आहेत. या अंतर्गत येत्या ३ डिसेंबर रोजी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर लिंगायत महामोर्चा काढण्यात येणार आहे.

या प्रसंगी बोलताना बसव ब्रिगेडचे तालुका प्रमुख संदीप माळी यांनी सांगितले की पुरोगामी संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला जपले आहे. राजकीय पक्ष व संघटनांनी आपल्या भूमिका जाहीर करणे सध्या आवश्यक असून सुज्ञ लिंगायत धर्मीय सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. लिंगायत धर्मियांचे आंदोलन कोणत्याही प्रकारे राजकीय नसून गेली ६० वर्षे सरकार दरबारी ही मागणी असल्याचे सांगितले.

गावशाखेचे अध्यक्ष हर्शल वाघिरे व सचिव अधिक तडसरे यांनी लिंगायत धर्म महामोर्च्याच्या तयारीचा आढावा सादर केला.

सर्व नेत्यांचे आभार बसव ब्रिगेडचे तालुका संपर्क प्रमुख दिपक कोकणे यांनी मानले.

या प्रसंगी गाव शाखेचे अध्यक्ष हर्षल वाघिरे, सचिव अधिक तडसरे, कार्तिक माळी, अक्षय माळी, लिंगायत युवा.कॉम चे संस्थापक डॉ. गोविंद धस्के व अनेक लिंगायत कार्यकर्ते उपस्थित होते.


स्वतंत्र लिंगायत धर्म आंदोलनास रासप, बामसेफ, बहुजन मुक्ती पार्टी व मराठा सेवा संघाचा सक्रीय पाठींबा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

हणमंतवडीये: क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त हणमंतवडीये येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रसिद्ध शाहीर

Close