‘सेल्फहूड’ देणार कडेगाव तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना विकासाच्या नेतृत्वाचे प्रशिक्षण0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: विकास प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असणारी ‘सेल्फहूड’ ही सल्लागार संस्था कडेगाव तालुक्यातील एक ग्रामीण शाळा दत्तक घेऊन तिथे ‘स्मार्ट स्कूल’  हा शाळेसाठी तर ‘आय एम द लीडर’ हा सामाजिक विकासासाठी नेतृत्व घडवणारा कार्यक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबवणार आहे, अशी माहिती सेल्फहूडचे संचालक व समाजिक संशोधक डॉ. गोविंद धस्के यांनी दिली.

या विकास प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत निवडण्यात आलेल्या शाळेत दर महिन्याला विद्यार्थी व शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी व राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळी प्रशिक्षणे राबवण्यात येतील. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यासाठी समुपदेशन सत्रे घेण्यात येतील.

निवडक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये शिकवण्यात येतील व प्रात्यक्षिक घेऊन वेगवेगळे विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याचा आरंभ करण्यात येईल. पुस्तकात दडलेलं नागरीकशास्त्र वास्तवात आणण्याची अत्यंत गरज असल्याची भावना सध्या शिक्षण तज्ञांमध्ये आहे यासाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती डॉ. धस्के यांनी दिली.

या प्रशिक्षणामध्ये सर्व घटकांना सामावून घेण्यात येणार असून शिक्षकांना व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे, संशोधनावर आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

यासंदर्भात कडेगाव तालुक्यातील एक ग्रामीण शाळा निवडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यासाठी इच्छुक खाजगी, निम-सरकारी व सरकारी शाळांनी ‘सेल्फहूड’शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


 

‘सेल्फहूड’ देणार कडेगाव तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना विकासाच्या नेतृत्वाचे प्रशिक्षण

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
“एक वही एक पेन” अभियानातून राष्ट्रनिर्माते डॉ. आंबेडकर यांना ६ डिसेंबरला अभिवादन

कडेगाव: "एक वही एक पेन" अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कडेगांव मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, नेर्लीच्या वतीने

Close