‘एक वही एक पेन’ अभियानास कडेगावकरांचा मोठा प्रतिसाद0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा ग्रंथालय नेर्ली’ च्या वतीने डॉ. आंबेडकर स्मृतिदिना निमित्त ‘एक वही एक पेन’ अभियान काल कडेगाव येथे राबवण्यात आले.

कडेगाव परिसरातील अनेक संस्था, राजकीय व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, बसव ब्रिगेड तालुका व गाव शाखा व नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने वह्या व पेन ग्रंथालयाचे सर्वेसर्वा चेतन सावंत यांचेकडे सुपूर्द केले.

अभियानात जवळपास ८०० वह्या व पेन जमा झाले. वांगी येथील निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना जमा झालेले वह्या व पेन सुपूर्द करण्यात आले आहेत.

अत्यंत अनोख्या पद्धतीने व कमी वेळ असतानाही हा उपक्रम राबवण्याचे ठरवून अध्यक्ष चेतन सावंत यांनी अभियान यशस्वीपणे पार पाडले याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होता, असे उपक्रम सतत राबवले गेले पाहिजेत,  असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.


 

‘एक वही एक पेन’ अभियानास कडेगावकरांचा मोठा प्रतिसाद

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘सेल्फहूड’ देणार कडेगाव तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना विकासाच्या नेतृत्वाचे प्रशिक्षण

कडेगाव: विकास प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असणारी 'सेल्फहूड' ही सल्लागार संस्था कडेगाव तालुक्यातील एक ग्रामीण शाळा दत्तक घेऊन तिथे 'स्मार्ट स्कूल'  हा

Close