डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: डॉ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापारीनिर्वाण दिनी कडेगाव येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन केले.

सकाळी मुख्य कार्यक्रम बुद्धवंदना व प्रतिमा पूजनाने झाला. बसस्थानक परिसरातील डॉ. आंबेडकर चौकामध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नेर्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयातर्फे ‘एक वही-एक पेन’ अभियान राबवण्यात आले. यामध्ये नागरिकांनी व संस्थांनी भेट दिलेल्या वह्या पेन वांगी येथील शाळेला देण्यात आले.

याच बरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनेक भीम सैनिकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

या प्रसंगी रासपचे जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते, आर पी आय चे जीवन करकटे व महादेव होवाळ, बसपाचे शिवलिंग सोनवणे, शिवसेनेचे विजय खाडे, मानवाधिकार संघटनेचे संतोष पिसाळ, महादजी शिंदे प्रतिष्ठानचे राजाराम शिंदेसरकार, नेर्लीचे उपसरपंच विजय लोंढे, माजी सभापती अरविंद लोंढे, सिकंदर मुजावर, मुस्लीम आघाडीचे तालुकाध्यक्ष दस्तगीर फकीर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष संकेत कांबळे पोलीस निरीक्षक पुजारी, कडेगाव नगरपंचायतचे विरोधी पक्षनेता उदय देशमुख, इम्तियाज शेख, प्रमोद मांडवे, श्रीकांत महाडिक, अमोल पवार, सुनील मोहिते, निखील धर्मे, कौशल धर्मे, अजिंक्य धर्मे, योगेश काट्रे, विठ्ठल खाडे, बसव ब्रिगेडचे संदीप माळी, हर्शल वाघिरे, अधिक तडसरे, दिपक कोकणे, इंजिनियर ज्ञानेश्वर शिंदे, दादा महाजन, ज्येष्ठ पत्रकार हरूण मुल्ला आदी उपस्थित होते.


18 thoughts on “डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन

Comments are closed.

डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
18
Read previous post:
श्री शिवकृष्णाई संस्था व बसव ब्रिगेडकडून ‘एक वही एक पेन’ अभियानास वह्या व पेन भेट

कडेगाव: नेर्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामार्फत राबवण्यात आलेल्या 'एक वही एक पेन' अभियानास कडेगाव येथील श्री शिवकृष्णाई संस्था व

Close