श्री शिवकृष्णाई संस्था व बसव ब्रिगेडकडून ‘एक वही एक पेन’ अभियानास वह्या व पेन भेट0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: नेर्ली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयामार्फत राबवण्यात आलेल्या ‘एक वही एक पेन’ अभियानास कडेगाव येथील श्री शिवकृष्णाई संस्था व बसव ब्रिगेड च्या तालुका व गाव शाखेतर्फे वही व पेन भेट देण्यात आले.

ग्रंथालयाचे सर्वेसर्वा चेतन सावंत यांनी पुढाकार घेऊन राबवलेल्या या उपक्रमास कडेगाव व परिसरात अत्यंत मोठा प्रतिसाद लाभला.

जमा झालेल्या वह्या व पेन वांगी येथील निवासी शाळेस दान देण्यात आल्या आहेत.

या प्रसंगी बोलताना ‘शिवकृष्णाई’ संस्थेचे अध्यक्ष हर्शल वाघिरे म्हणाले की डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्याचा चेतन सावंत यांनी निवडलेला मार्ग अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे परिसरातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागणार आहे. संस्थेतर्फे कार्याध्यक्ष योगेश कडले यांनी चेतन सावंत यांना वह्या सुपूर्द केल्या.

बसव ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष संदीप माळी यांनी चेतन सावंत व  सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे अभियान राबवल्याबद्दल कौतुक केले व अश्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात बसव ब्रिगेड सहभाग घेईल असे आवर्जून नमूद केले.


श्री शिवकृष्णाई संस्था व बसव ब्रिगेडकडून ‘एक वही एक पेन’ अभियानास वह्या व पेन भेट

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
‘एक वही एक पेन’ अभियानास कडेगावकरांचा मोठा प्रतिसाद

कडेगाव: 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा ग्रंथालय नेर्ली' च्या वतीने डॉ. आंबेडकर स्मृतिदिना निमित्त 'एक वही एक पेन' अभियान काल

Close