कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव:  कडेगाव नगरपंचायतीने धडाक्यात सुरु केलेल्या स्वच्छता कारवाईमुळे गावामध्ये अनेक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची प्रक्रीया सुरु असून त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

मागील काही आठवड्यात समोर आलेल्या डेंग्यूच्या केसेस आणि सार्वजनिक ठिकाणी उत्स्फूर्तपणे नवशहरी मंडळी व बेजबाबदार नागरीकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे सर्वत्र माजलेली दुर्गंधी व अनारोग्य यामुळे अनेक सुजाण नागरिकांनी आरोग्य विभाग व नगरपंचायत यांच्याकडे तक्रारीच्या भावना कळवल्या होत्या.

कडेगाव परिसरातील मुक्त शहरीकरण प्रक्रियेत स्वच्छतेचे शिक्षण देण्याची व दंडात्मक कारवाई करण्याची गरज निर्माण झाल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.  त्याचसोबत नगरपंचायतीने विक्रेत्यांनी त्यांच्या उत्पादनामुळे होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट स्वतःहून जबाबदार उद्योग/ व्यावसायिक म्हणून घ्यावी अशी रचना करण्याची आवश्यकता असल्याचा सूर काही जबाबदार नागरिकांमध्ये आहे.

मुख्याधिकारी चरण कोल्हे व नगराध्यक्षा आकांक्षाताई जाधव याबाबत काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे. लवकरच निवडक ठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या तसेच कचरा गोळा करण्याची व्यवस्था सक्षम केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी कोल्हे यांनी दिली आहे.

 नगरपंचायतीच्या धडाक्यात सुरु असलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


 

One thought on “कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु

Comments are closed.

कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
1
Read previous post:
डॉ. आंबेडकर महापरीनिर्वाण दिनी विविध संघटनांचे सामाजिक उपक्रमातून अभिवादन

कडेगाव: डॉ. आंबेडकर यांच्या ६२ व्या महापारीनिर्वाण दिनी कडेगाव येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन

Close