टेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व पाणीपट्टी विरोधात उद्या कडेगावमध्ये भव्य मोर्चा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: बराच काळ भागातील सर्वच नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे निकालात न निघालेला  टेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व वाढीव पाणीपट्टीच्या प्रश्न सोडवण्यासाठी  उद्या (१४ डिसेंबर २०१७) कॉंग्रेस पक्षातर्फे कडेगाव येथे भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.

युवानेते डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजता निघणाऱ्या या मोर्च्यासाठी कडेगाव-पलूस भागातील शेतकरी बांधव सज्ज झाले  आहेत.

काल यासंदर्भात कडेगाव येथे कॉंग्रेस कार्यकारणीची बैठक पार पडली यामध्ये मोर्च्यासंबंधी सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. जितेश कदम यांनी मोर्च्यासंबंधी आघाडी घेऊन भागातील शेतकऱ्यांना एक करण्याच्या प्रेरणादायी प्रयत्न सुरु ठेवला आहे.

या मोर्च्यामध्ये  कॉंग्रेस नेते शांताराम कदम तसेच कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी असणार आहेत.

पाणीप्रश्न हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने उद्याच्या मोर्च्यानंतर राजकीय पातळीवर काय घडामोडी घडणार याविषयी भागामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

रब्बी हंगामासाठीचे आवर्तन वीजबिल थकबाकीमुळे अजूनही सुरु नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. याचबरोबर पाणीपट्टी कमी व्हावी अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात काल देवराष्ट्रे इथे रास्ता रोको व निदर्शने झाली होती.

या मोर्च्यासाठी उद्या मोठ्या प्रमाणात भागातले समस्या प्रभावित शेतकरी सामील होण्याची शक्यता आहे त्यामुळे कडेगाव मध्ये उद्या प्रशासकीय यंत्रणेवर सुरक्षेची मोठी जबाबदारी असणार आहे.


टेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व पाणीपट्टी विरोधात उद्या कडेगावमध्ये भव्य मोर्चा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव नगरपंचायतचे स्वच्छता अभियान जोमात सुरु

कडेगाव:  कडेगाव नगरपंचायतीने धडाक्यात सुरु केलेल्या स्वच्छता कारवाईमुळे गावामध्ये अनेक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्याची प्रक्रीया सुरु असून त्याबद्दल नागरिकांमध्ये समाधानाची

Close