एका प्रवासाचं स्वप्न: जागृती यात्रा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

शशांक मणि त्रिपाठी या तरुणानही असंच एक स्वप्न पाहिलं उद्योजकतेतून भारत घडवण्याचं…आणि साकारली चैतन्याने भारलेली ‘जागृती यात्रा’. काय आहे जागृती यात्रेच्या स्थापनेचा इतिहास? कोणत्या उद्देशाला साध्य करण्यासाठी भरवली जाते ही यात्रा ? चला जाणून घेऊया !

भारतीय स्वतंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात, १९९७ साली, या यात्रेच बीज रोवलं गेलं. भारत जाणुन घेण्यासाठी व आपल्या देशासमोरील प्रश्न आभ्यासण्याच्या उद्देशाने २०० समविचारी तरुण तरूणींना सोबत घेऊन शशांक मणी त्रिपाठी यांनी २२ दिवसांचा भारत दौरा आखला. अत्यंत प्रयत्नाने तो पूर्णही करण्यात आला. या तरुणाई सोबत केलेल्या भारत दौऱ्यावरत्यांनी एक पुस्तक लिहिल- “India: A Journey Through A Healing Civilization by Shashank Mani” हे पुस्तकही खूपच प्रसिध्द झाले.

या यात्रेच्या पहिल्यावहिल्या अनुभवानंतर यात्रेतील काहीं सहभागींनी पुढाकार घेऊन २००८ साली जागृती यात्रेची पहिल्यांदा अधिकृत सुरवात केली. ह्यावर्षी, २०१७ मधे, जागृती यात्रा आपला दहावा वर्धापनदिन साजरा करतेय ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे.

आपल्याला ज्या भुमी साठी काम करायचंय ज्यां लोकांच्यासाठी काम करायचंय तो भारत पाहिला पाहिजे अनुभवला पाहिजे या उद्देशाने एकेकाळी स्वामी विवेकानंद यांनी सुद्दा भारत परीक्रमा केली होती. इतिहासात अजुनही अशी बरीच उदाहरणं आहेत. जागृती यात्रा हे असंच एक स्वप्न आणि प्रवास.

गेल्या काही वर्षापासून दरवर्षी ही उद्योजक घडवणारी यात्रा निघते. यासाठी भारताच्या विविध भागांतून तसंच विदेशातूनही २० ते २७ वर्ष वयोगटातील तरुण-तरुणींची निवड केली जाते. यात्रेदरम्यान आवडीच्या निकषांवर वेगवेगळ्या गटात विभागणी केली जाते त्यामध्ये कृषि, शिक्षण, कला, आरोग्य-स्वच्छता, तंत्रज्ञान, ग्राम विकास या विषयांचा समावेश असतो.

जागृती यात्रेच्या ८००० किमी च्या प्रवासात १२ महत्वाचे थांबे आहेत. उद्योगातून विकास, राष्ट्रीय एकात्मिकता, ग्राम विकास, महिला व युवक, देशाची उभारणी या पंचसूत्रीच्या अनुषंगाने उद्यम प्रणित भारत निर्माण संकल्प सोडला जातोय. यात्रेदरम्यान ट्रेन मध्ये किंवा विविध थांब्यावर आदर्श व्यक्तिमत्वाची भेट घडवली जाते त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळते. त्यांनी उभे केलेले सामाजिक उद्योग, ग्रामविकासाचे मॉडेल्स यांना भेट दिली जाते. यात्रेच्या बारा थांब्यांची निवडही याच हेतूने केली गेलीय.

मी जागृती यात्रेत कसा सहभागी झालो

बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…२०१० साली मी पहिल्यांदा जागृती यात्रे संदर्भात ऐकलं आणि वाचलं.  तेंव्हापासून मी या संकल्पनेच्या प्रेमात पडलो. मला आठवतंय डिग्रीच्या आमच्या वर्गात मी सर्व मित्रांना  बोलावून या विषयी एक लेक्चर दिलं होत. सात वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण व्हायला २०१७ उजाडावं लागलं. दरम्यानच्या काळात शिक्षण, नोकरी इतर बऱ्याच कारणांनी कधी अर्जच केला नाही. कधी कधी वाटायचं: “लय लोकं अर्ज करत्यात. आपला नंबर नाही लागायचा!” (हे सांगतोय कारण असा विचार करून आपणच आपल्या प्रगतीच्या/स्वप्नांच्या आड येत असतो.)

आता आपण २०१७ च्या जागृती यात्रेचा भाग आहोत ही भावनाच खूप सुखावून टाकणारी आहे कारण हे छोटंसं स्वप्न २०१० पासून स्वतःशी बाळगून होतो. २४ डिसेंबर २०१७ ला सुरु होणाऱ्या  जागृती यात्रेत मी फॅसिलिटेटर म्हणुन सहभागी होतोय त्याबद्दलही बरच कुतूहल मनात आहे. आता सोशल मीडिया मुळे गोष्टी खुप वेगवान झाल्यात आणि जागृती यात्रेचा वॉट्सअँप वर ग्रुपही तयार झालाय. किती विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत ही. प्रत्येकावर एखाद पुस्तक लिहिता येईल एवढं वैविध्य. या यात्रेसाठी कोणी सायकलवरून हैद्राबाद ते मुंबई असा प्रवास करून येतंय, तर कोणी आपलं पाहिलं व्यंगचित्राच नियतकालिक अनावरणाच्या तयारीत आहे… असं बरंच काही घडतंय. या बहुरंगी-बहुढंगी जगाच्या/भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या यात्रींना भेटण्याची प्रचंड उत्सुकता आहे. बरं अशी एक दोन न्हव तर तब्बल  ५०० अवलिये लोकं या मध्ये सहभागी होणार आहेत..

जागृती यात्रे मध्ये सहभागी कसे व्हाल ?

माहिती मिळवणे आणि अर्ज करण्यासाठी www.jagritiyatra.com या संकेतस्थाळावर भेट द्या (हे संकेतस्थळ इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे)

अर्ज भरणे, आपल्या संबधी व आपल्या कामासंदर्भात काही प्रश्नांची उत्तरं लिहिणं.

यातुन पार झालात की टेलिफोनिक मुलाखत होते निवड झाल्यावर मेल द्वारे कळवलं जातं.

आता हे सर्व करून फायदा काय किंवा का भाग घ्यायचा ? 

तुम्ही जर फिरण्याची आवड जोपासत असाल, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील लोकांना भेटायला तुम्हाला आवडत असेल/त्यांच्या कामाबद्दल जाणुन घ्यायच कुतूहल तुमच्यात निर्माण होत असेल,जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यापर्यंत पोहचवावे हा गुण जर तुमच्यात असेल, स्वतःचा व्यवसाय सुरु करताय/केलाय, सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर तुमच्यात असेल तर ही यात्रा तुमच्याच साठी आहे मित्रांनो.

अजुन बरंच काही सांगायचंय, लिहायचंय. यात्रे दरम्यानही लिहायचा संकल्प आहे बघू कसं जमतंय !

क्रमश:

लेखक: आशिष अरुण भोसले (यात्री)

#jagritiyatra #jy2017 #10thedition #Yatri2017 #Yaaronchalo #middle_india #social_entrepreneur #travel #Train_journey

8 thoughts on “एका प्रवासाचं स्वप्न: जागृती यात्रा

Comments are closed.

एका प्रवासाचं स्वप्न: जागृती यात्रा

by Ashish Bhosale वाचनाचा वेळ: <1 min
8
Read previous post:
टेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व पाणीपट्टी विरोधात उद्या कडेगावमध्ये भव्य मोर्चा

कडेगाव: बराच काळ भागातील सर्वच नेत्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे निकालात न निघालेला  टेंभू-ताकारी-म्हैसाळच्या पाण्याचे आवर्तन व वाढीव पाणीपट्टीच्या प्रश्न सोडवण्यासाठी  उद्या

Close