जागृती यात्रेची झुक झुक गाडी सुरु…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

आम्ही सर्व रात्री झोपलोच अडीच तीन वाजता म्हणजे गप्पा किती रंगल्या असतील तुम्ही समजू शकता.

पहिलाच दिवस असल्याने 6 ची उठण्याची सूचना कंट्रोल रूम ने संध्याकाळी 7 वाजता रेडिओ  वरून दिली. सर्व बोगीत स्पीकर लावलेत, सूचना देण्यासाठी.

सर्वांची उत्सुकता ताणून धरलेल्या अंघोळीच्या बाथरूम ला भेट देण्याची वेळ जवळ आली (मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं यात्रेला आल्याशिवाय बाथरूम समजत नाही आणि कोणी सांगत ही नाही…मी पण नाही सांगणार !)

पण 100 किमी वेगाने चालणाऱ्या ट्रेनमध्ये आज आयुष्यात पहिल्यांदा आंघोळ केली ते ही अर्ध्या बादलीचा मंत्र जपत. हा अनुभव भारीच होता.

उत्तम नाष्ट्याने दिवसाची सुरुवात झाली, कॅटरिंग टीमचाही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे . एवढ्या निमुळत्या जागेतून वाट काढत स्वतः बरोबर जेवणाच्या वस्तू इतर साहित्य घेऊन जायचं त्यात लोकांची ये-जा चालू असते हे  दिवसातून किमान 5 वेळा करायचं म्हणजे या पठ्ठ्याना मानलंच पाहिजे…

सुरवातीलाच गटातल्या प्रत्येकाला एकमेकांची ओळख व्हावी यासाठी लाईफ लाईन चा उपक्रम गट म्हणून केला गेला.  यात प्रत्यकाने आपलं जगणं उतार चढाव सर्व आलेखाच्या माध्यमातून सांगायचं, चितारायच असं काहीसं प्रकरण होतं.

आमच्या गट  महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र-तेलंगाणा, उत्तर प्रदेश, US, कॅनडा अशा विविधतेने भरलाय. कॅनडाच्या अलेक्स जिन, राजेंद्र पाचोरी बरोबर क्लायमेट चेंज हा विषय घेऊन जगभर फिरलेली काही डोकी आजूबाजूला आहेत बरका.

दुसऱ्या बाजूला आहेत  2 उत्तर प्रदेशच्या महिला ज्या त्यांच्या भागातल्या 500 महिलांचे प्रतिनिधित्व करत असतील. त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे.

तसा आजचा दिवस पूर्ण ट्रेनवरच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचे लेक्चर, खुप साऱ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीज, आणि या सगळ्या धबडग्यात  आमची पोरं सांभाळणं त्यांच्यापर्यंत सूचना पोहचवणे आशा गोष्टी आज खूप वेळ चालू होत्या.

रात्री फॅसिलिटेटर ग्यांगची जेवताना एक मीटिंग झाली (ओव्हर अ डिनर म्हणजे खात खात चर्चा करत किंवा चर्चा करत करत जेवणावर ताव मारत) . नेहमीप्रमाणे काही गोष्टींचं नियोजन तर आलेले अनुभव त्यावर आधारीत सूचना.

आमच्या ग्रुपने ठरवलं रात्री झोपायच्या आधी पंधरा-वीस मिनटं दिवसभराचा अनुभव एकमेकांना सांगायचा.

सर्वांसाठी दिवस तास खूप व्यस्त आणि बराच काही शिकवणारा होता.

‘जागृती यात्रेची ट्रेन सुरु झालीय.

उद्या भेटू परत नव्या मुक्कामाची नवी खबर घेऊन.


6 thoughts on “जागृती यात्रेची झुक झुक गाडी सुरु…!!!

Comments are closed.

जागृती यात्रेची झुक झुक गाडी सुरु…!!!

by Ashish Bhosale वाचनाचा वेळ: <1 min
6
Read previous post:
‘जागृती यात्रा’: सुरवातीची सुरवात सुरु…!!!

जागृती यात्रेच्या तयारीसाठी अनेक प्रकारचे नियोजन केले जाते. या यात्रेसाठी माझी एक 'यात्रेकरू' म्हणून निवड झाली असली तरी माझा शेती

Close