…आणि देव भूमीत आमचे पदार्पण झाले !0 मिनिटे
नाताळ नंतरच्या सकाळी आम्ही देवभुमीत पदार्पण केले…….होय, बरोबर वाचलेत, ‘देवभूमीच’ !
मी केरळ या आपल्या सांगली-सातारा जिल्ह्याच्या आकाराच्या परंतु अत्यंत प्रगतीशील समजले जाणाऱ्या राज्याविषयी बोलत आहे.
आजपर्यंत मी केरळमध्ये दोन वर्षे राहिलोय. बऱ्याच वेळा ह्या रस्त्याने प्रवासही केलाय, परंतु आज मी देवभूमीतली सकाळ ट्रेन मधून अनुभवत होतो.
हा आनंद आणि प्रसंग नेहमीच लक्षात राहतील यात शंका नाही.
आमच्या ग्यांगमधले जे पहिल्यांदा प्रवास करत होते किंवा दक्षिणेकडे पहिल्यांदा येत होते ते खुप खुष होते. बाहेर दिसणारं नयनरम्य दृष्य त्यांच्या प्रवासात रंग भरत होते.
दिवस सुरू झाल्यापासून पुकारल्या जाणाऱ्या सुचनेवर इकडून-तिकडून पळत होतो. वेगवेगळ्या बोगी मध्ये वेगवेगळे माहितीचे सेशन चालू होते, प्रत्येकाच्या आवडीनुसार ज्याला जे रुचेल तिकडे ह्या बोगीतून त्या बोगीत धावणे सुरु होते. आतमध्ये देश बदलायची आग घेऊन जागृती यात्रेत आलेली ही तरुणाई ‘प्याशन’ मध्ये तसूभरही कमी नाही याचे हे निदर्शक.
सर्वांना उत्सुकता होती की 40 तासाच्या प्रवासानंतर आपण भारताच्या दक्षिण टोकावर असणार आहोत, जिथं विवेकानंदांची पावलं लागली होती, आजच्याच दिवशी 125 वर्षापूर्वी जिथं त्यांनी भारताला पुन्हा जगतगुरु करण्याची शपथ घेतली होती. ह्या ठिकाणी एक वेगळीच जादू आहे. माणुस आतून शांत होतो. कन्याकुमारी ला जाण्याची माझी तिसरी वेळ. फरक इतकाच की यावेळी माझ्यासोबत विवेकानंदांच्या व्हिजनला पुढे नेवू शकणारे भारतीय मानवी जीव आहेत आहे त्यांचे संकल्प खरोखरच अप्रतिम आहेत.
कन्याकुमारी भेट म्हणजे जागृतीयात्रेच्या वैचारिक पायाचं लक्षण म्हणायला हवं.
दुपारच्या वेळेस स्वप्नील ने एक घेतलं- ‘Brainstorming Ideas’ आणि ते करण्याच्या काही पद्धती यावर. धमाल आणली पठ्ठ्याने. चालू ट्रेनमध्ये त्याच्या वेगळ्याच गावाला मनातल्या मनात घेऊन गेला. शेती क्षेत्रातील गुंतवणूक सारख्या विषयावरही सेशन झालं. पूर्ण बोगी भरली होती प्रत्येक जण हिरीरीने सेशन्समध्ये भाग घेत होता.
कन्याकुमारीतं आम्ही विवेकानंद केंद्रात जमलो तिथं राष्ट्रीय एकात्मिता विषयाला धरून चर्चा आणि कार्यक्रम झाले. त्याचाच भाग म्हणून 25 जलतरणपटूनी विवेकानंद शिळा ते किनारा हे अंतर पोहून पार केलं.
प्रत्येकाला संकल्प पत्र वाटण्यात आले होते त्यावर भारत निर्माणासाठी प्रत्येकाने आपले संकल्प लिहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी शपथ घेतली त्या अनुषंगाने 3000 कंदील आकाशात सोडायचं नियोजन होत पण हवेने साथ दिली नाही त्यामुळे तो बेत कॅन्सल झाला.
मग काहींनी कंदिलाच्या विघटन आणि पर्यायाने निसर्गाबद्दल काळजी व्यक्त केली मग काय ट्रेन कडे जाताना त्यावर भली मोठी चर्चा.
दिवसभर ओळखी करून घेणे, भेटीगाठी, विषय समजून घेणाऱ्या चर्चा यांनी भरला होता.
जागृती यात्रेची नवी कडी घेऊन उद्या पुन्हा भेटू.
Pingback: Generic cialis
Pingback: cialis subscription
Pingback: real cialis without a doctor's prescription
Pingback: online pharmacy
Pingback: Buy generic viagra
Pingback: Viagra 20 mg
Pingback: Viagra 20 mg best price
Pingback: Viagra 20 mg