गायरान वाचवण्यासाठी तडसरकरांचे धरणे आंदोलन सुरु0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: तडसर गाव हद्दीतील ५८-५९ हेक्टर गायरान जमीन वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी देण्याच्या शासनाच्या हालचाली तडसर ग्रामस्थांवर अन्यायकारक आहेत, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी कालपासून कडेगाव प्रांत कार्यालासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

वांग धरणाने बाधित झालेल्या नागरिकांसाठी तब्बल २०० हेक्टर संपादित जमीन शिल्लक असताना शासन तडसर ग्रामपंचायतीची विकासकामासाठी उपलब्ध असणारी अल्पशी गायरान जमीन घेत असून हा निर्णय गावाच्या विकासावर आणि पर्यावरणावर घातक परिणाम करणारा आहे, अशी माहिती लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिली.

तडसर गावाचे गायरान शासकीय निकषानुसार पहिले तर चुकीच्या पद्धतीने हिरावून घेतले जात आहे म्हणून सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे शासनास निर्णय बदलण्याची अपील करत आहेत, अशी माहिती सरपंच हणमंतराव पवार यांनी दिली.

तडसर हे विकासोन्मुख गाव असून इथे सध्या नियोजित असलेली विकासकामे व आगामी काळात सुरु करण्यात येणारे आणखी काही प्रकल्प व ग्रामस्थांच्या अधिकारात बसणाऱ्या मुलभूत सुविधा यासाठी सध्याचे गायरान काटकसर करून वापरण्याचे संयोजन सुरु असताना शासनाने गायरान धरणग्रस्त विस्थापितांना देणे अन्यायकारक आहे, अशी सर्व ग्रामस्थांची भावना असून जोपर्यंत शासकीय निर्णय गावकऱ्यांच्या हिताला समोर ठेवून होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

आंदोलनामध्ये सर्व ग्रामस्थ सामील होऊन एकजूट दाखवत आहेत आणि तब्बल १५०- २०० नागरिक कालपासून प्रांत कार्यालयासमोर निषेध नोंदवून गायरान वाचवण्यासाठी धडपडत असताना दिसत आहेत.

या संदर्भात अजूनही शासकीय भूमिका स्पष्ट करण्यात न आल्याने संदिग्धता आहे.


  ADVT

 

15 thoughts on “गायरान वाचवण्यासाठी तडसरकरांचे धरणे आंदोलन सुरु

Comments are closed.

गायरान वाचवण्यासाठी तडसरकरांचे धरणे आंदोलन सुरु

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
15
Read previous post:
जागृती यात्रेची झुक झुक गाडी सुरु…!!!

आम्ही सर्व रात्री झोपलोच अडीच तीन वाजता म्हणजे गप्पा किती रंगल्या असतील तुम्ही समजू शकता. पहिलाच दिवस असल्याने 6 ची

Close