तडसर ग्रामस्थांच्या गायरान वाचवण्याच्या लढाईचा सोक्षमोक्ष आता हायकोर्टात0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

तडसर: शासकीय आदेशानुसार आवश्यक गायरान क्षेत्र गावाच्या विकासकामासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी तडसर ग्रामस्थांनी ‘वांग’च्या पुनर्वसनास विरोध केला व धरणे आंदोलन केले. तरीही प्रशासकीय पातळीवर आवश्यक निर्णय न झाल्याने आता ही लढाई हायकोर्टात जाऊन पोचली आहे. तडसर ग्रामस्थांनी अत्यंत निकराचा लढा देत हायकोर्टात आपले दावे दाखल केले आहेत. त्यामुळे सध्या गायरान देण्यास स्थगिती देण्यात आल्याची माहिती तडसरचे विकासोन्मुख सरपंच हणमंतराव पवार यांनी दिली.

सध्या उपलब्ध असलेल्या ५९ हेक्टर गायरानमध्ये ६१ खातेदारांचे पुनर्वसन करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता त्यामुळे शासकीय आदेशानुसार आवश्यक ५ टक्के जमीन शिल्लक न राहता फक्त १.५ टक्के जमीन उरत आहे असा युक्तिवाद गावकऱ्यांनी केला आहे.

इथून पुढची लढाई कोर्टात होणार आहे हे उघड आहे. यासाठी ग्रामस्थांनी सरपंचांच्या नेतृत्वाखाली आघाडी उघडली आहे. तडसर गावामध्ये सध्या उपलब्ध गायरानामध्ये अनेक मंजूर विकासकामे सुरु होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सुरु असलेल्या वादामुळे त्यास खोडा बसला आहे, अशी भावना गावकऱ्यांच्या मनात वाढत असल्याचे दिसत आहे.

सोनहिरा खोऱ्यातील अनेक क्रांतिकारी गावांपैकी तडसर गाव आधीपासून अत्यंत कार्यशील व स्वाभिमानी म्हणून ओळखले जाते. नामवंत लेखक, शिक्षक, वकील, आणि अनेक पी एचडी विद्वान देणाऱ्या तडसर गावाची नव्या काळातील ही कायदेशीर लढाई आता राज्यात चर्चिली जात आहे.


 

तडसर ग्रामस्थांच्या गायरान वाचवण्याच्या लढाईचा सोक्षमोक्ष आता हायकोर्टात

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे एस टी सुविधाविषयी निवेदन

कडेगाव: राष्ट्रीय महिला मुलनिवासी संघातर्फे काल कडेगाव  जि. सांगली येथे बसस्थानक नियंत्रकाना एस टी सेवेमध्ये सुधारणा होण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

Close