कडेगावचा आठवडी बाजार होऊ लागला आहे शिस्तबद्ध…!!!0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: दर शुक्रवारी कडेगावचा पारंपारीक आठवडी बाजार भरतो. वाढती लोकसंख्या आणि बेशिस्त शहरीकरणाच्या  प्रभावामुळे अलीकडे बाजारामधून फिरणे फारच आव्हानात्मक होऊन गेले होते. विशेषतः महिलावर्गास व्यवस्थित चालता येईल आणि आनंदाने खरेदी करता येईल अशी परिस्थिती राहिली नव्हती.

यंदाच्या संक्रांतीच्या बाजारात महिलांची गर्दीमुळे फारच गैरसोय झाली होती. याला कारण म्हणजे परगावहून आलेली विक्रेती मंडळी ज्यांनी बाजाराची शिस्त झुगारून रस्त्याच्या मधोमध भाजी विक्री करणे सुरु केले होते. याचबरोबर, बेधुंद दुचाकीस्वार आणि त्यांचा बाजारातून गाडी घालण्याचा अट्टाहास यामुळेही खूपच समस्या तयार होत होत्या.

अलीकडेच नगरपंचायत प्रशासनाने या समस्येवर तोडगा काढून भाजी विक्रेत्यांची रस्त्याच्या मध्ये बसणारी लाईन बंद केली. यासाठी मागच्या आठवड्यात नगरपंचायत कर्मचारी अगदी डोळ्यात तेल घालून शिस्त आणण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे चालण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध झाली आहे.

या नव्या बदलामुळे बाजारामधून खरेदी करणे हा काही अंशी का होईना आनंदी अनुभव झाला आहे. अजूनही दुचाकी स्वारांची समस्या आहे. त्यावर तोडगा निघेल अशी आशा सध्या सामान्य जनता करत आहे.

एकूणच नगरपंचायतीने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे जनातेमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

कडेगावचा आठवडी बाजार होऊ लागला आहे शिस्तबद्ध…!!!

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
पलूसमध्ये पंचवीस हजार सभासद करण्याचा सेनेचा निर्धार

पलूस:  हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पलूस तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. या प्रसंगी पंचवीस हजार सभासद करण्याचा निर्धार

Close