सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ११ फेब्रुवारीपासून कणेरी मठ ज्ञानपीठ येथे0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कणेरी मठ (विठ्ठल धर्माधिकारी): यंदा ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभचे आयोजन’ ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान सिद्धगिरी कणेरी मठ, कोल्हापूर येथे होत असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.

भारतातील सर्वात मोठ्या ‘भारतीय संस्कृती उत्सव-२०१५’ च्या यशस्वी आयोजनानंतर यावर्षी ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ- २०१८’ चे आयोजन केले आहे.  गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या नियोजनातून सिद्धगिरी कणेरी मठ येथे कारागीर ज्ञानपीठ स्थापन होत आहे.  या ज्ञानपीठाच्या माध्यमातून विविध शास्त्रशुद्ध व अद्ययावत कारागीर अभ्यासक्रम व प्रशिक्षण सुरु होणार आहे. या ज्ञानपीठाच्या उदघाटनानिमित्त या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

या कारागीर महाकुंभसाठी देशपातळीवरील कुशल कारागीर उपस्थित राहणार असल्याने सोहळ्याला अनोखे महत्व असून प्रात्यक्षिक व प्रदर्शन अशा स्वरुपाचा हा सोहळा आहे. या सोहळ्यात २०० हून अधिक कुशल कारागीर विविध राज्यांतून सहभागी होणार आहेत.  बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्या लुप्त होत असलेल्या कारागिरी यानिमित्ताने आधुनिक पद्धतीने कशा जोपासल्या जाणार आहेत याचीच ही झलक असणार आहे.

या कारागिरी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या कलाकारांची काही वैशिष्ट्ये जाणून घेण्यासारखी आहेत ती खालीलप्रमाणे:

• वीणकामाचे नाजूक कलाकुसर करणारे कारागीर

• कर्नाटक राज्यातील स्फटीकात मूर्ती तयार करणारे कारागीर

• दीमडीपासून ढोल-ताशापर्यंत, पखाली, मोट अशा चामड्याच्या वस्तू तयार करणारे चर्मकार

• तांबे, पितळ आणि कास्याची भांडी व इतर वस्तू बनविणारे कारागीर

• पामच्या पानापासून विविध वस्तू तयार करणारे कारागीर

• नारळाच्या पानापासून फुले-चटई-भिंतीवर टांगावयाच्या शोभेच्या वस्तू तयार करणारे अवलिये कारागीर

• नारळाच्या पानापासून बुट्टया आणि टोप्या तयार करणारे कारागीर

• मातीची विविध प्रकारची भांडी क्षणात तुमच्यासमोर तयार करून देणारे कुंभार कारागीर

• देशाची खेळण्यांची राजधानी अशी ओळख असलेल्या चेन्नापटना, म्हैसूर येथील कलाकार २०० पेक्षा जास्त लाकडी खेळण्यांचा खजिना बालचमूंसाठी घेवून येणार आहेत

• जनावरांच्या शेणापासून तोरण, घड्याळ,बाहुल्या तयार करणारे कारागीर

• केळीच्या बुंध्यापासून विविध शोभेच्या वस्तू व वापरावयच्या वस्तूंचे प्रदर्शन व कारागिरी

• शंख-शिंपल्यापासून शोभेच्या हजारो वस्तू तयार करणारे कारागीर

• गोधडीपासून तयार केलेले जॅकेट, ओढणी, उपरणे, टेबलक्लॅथ अनेकविध वस्तू

तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने देशी गो-प्रतियोगीता व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये खालील प्रकार पाहायला मिळणार आहेत.

• बारा लिटर दूध देणारी देशी खिल्लार गाय

• पंधरा लाखांचा खिल्लार वळू – चॅम्पियन खिल्लार

• अडीच टनाचा गीरचा नंदी – भारतातील सर्वात मोठा गीरचा नंदी

• भारतातील २२ प्रजातीचे गोवंश पाहण्याची संधी

• आज्ञाधारी गायी व आज्ञाधारी बैलांच्या कसरती पाहण्याची संधी

या महाकुम्भामध्ये खाद्य रसिकांसाठी देशातील अनोख्या खाद्यप्रदार्थांची चव खाद्य महोत्सव अंतर्गत आयोजित करण्यात आली आहे.

यामधील काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी खालील प्रमाणे:

  • पुथरेकू – तांदळाच्या कागदापासून बनवण्यात येणारी अनोखी मिठाई
  • १२० प्रकारचे डोसे तयार करून देणाऱा हैद्राबादचा अवलिया
  • खानदेशी मांडे, पाच प्रकारच्या भाकरी, २५ प्रकारच्या चटण्या, राजस्थानमधील ५० प्रकारची लोणची

वरील सर्व अनोख्या अयोजानासोबतच खाद्य रसिक मधुमेहींसाठी खास दालन, सेंद्रीय शेती कार्यशाळा व प्रदर्शन,  दुर्मिळ शेती बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री या प्रदर्शनात होणार आहे.

या प्रदर्शनास दररोज किमान १ लाख लोक भेट देतील असा विश्वास आहे.  सिद्धगीरी कारागीर महाकुंभ अशा प्रकारचा सोहळा एक अनोखा उपक्रम आहे. एकाचवेळी देशातील विविध कुशल कारागिरांची कारागीरी पाहण्याची संधी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, उद्योजक, बेरोजगार यांना मार्गदर्शक ठरणाऱी आहे.

सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ११ फेब्रुवारीपासून कणेरी मठ ज्ञानपीठ येथे

by विठ्ठल धर्माधिकारी वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
तडसर येथे संत रोहिदास जयंती उत्साहात साजरी

तडसर: येथे संत रोहिदास यांची जयंती अत्यंत उत्साहात पार पडली. जनता क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आकाश सातपुते हे अध्यक्ष

Close