रासप जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांचा पदाचा राजीनामा0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

चिंचणी: राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलीले पत्र व त्यांची राजीनामा देण्यामागची भूमिका  त्यांनी ‘कडेगाव-पलूस लाईव न्यूज’शी बोलताना व्यक्त केली.

आंबेडकरी चळवळ व विचार यांना वाहिलेला एक सच्चा व प्रामाणिक कार्यकर्ता असल्याने तसेच सुरवातीपासून शाहू-फुले-आंबेडकर विचारांच्या मुशीत तयार झालेला असल्याने राजकीय पक्षांमधून काम करताना अनेक वैचारीक आणि मुल्यांची बंधने जाणवत होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. अगदी लहानपणापासून लोकांसाठी आंबेडकरी चळवळीचा विचार घेऊन काम करत आलेला असल्याने चळवळ ही जितकी सामाजिक ओळखीमध्ये आहे तशीच ती कौटुंबिक आणि अत्यंत वैयक्तीक पातळीवरसुद्धा महत्वाची ओळख म्हणून आहे.

वादग्रस्त व बहुजनांच्या हिताची मुक्तपणे भूमिका घेताना येणारी राजकीय बंधने नकोशी वाटल्यानेच जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या काळात लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येवून पूर्वीप्रमाणे सामाजिक न्यायाची लढाई सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

रासप जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांचा पदाचा राजीनामा

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सिद्धगिरी कारागीर महाकुंभ ११ फेब्रुवारीपासून कणेरी मठ ज्ञानपीठ येथे

कणेरी मठ (विठ्ठल धर्माधिकारी): यंदा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभचे आयोजन' ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान सिद्धगिरी कणेरी मठ, कोल्हापूर येथे होत

Close