भारतातलं मध्यमवर्गाच राजकारण पुन्हा एकदा रिंगणात ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

काही वर्षापूर्वी मेणबत्त्या घेऊन आणि गिटारी घेऊन क्रांतिकारी उर्जा म्हणजे शहरी मध्यमवर्गाची मक्तेदारी असल्यासारखे रंजक एकतर्फी चित्र मिडिया आणि हौशी राजकारणी मंडळींनी तयार केले होते. अगदी तश्याच पद्धतीचे नसले तरी पुन्हा एकदा शहरी मध्यमवर्गाला धरून जागतिक आणि देश पातळीवर नवनव्या चर्चांना उधाण येवू पहात आहे.

४ तारखेच्या इकॉनॉमिक टाईम्स संपादकीयामध्ये टी के अरुण यांनी ‘पंतप्रधान मोदी यांच्याप्रती भारतातल्या मध्यमवर्गाचा दृष्टीकोन याच मिडल क्लासच्या राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीकोनाशी सबंधित असल्याचे प्रतिपादन केले आहे. काही दिवसापूर्वी एका प्रथितयश आंतरराष्ट्रीय प्रकाशनात भारतात ‘संख्येने प्रबळ मध्यमवर्ग अस्तित्वात नसल्याचे’ आणि ‘याचे दूरगामी आर्थिक परीणाम होत असल्याचे’ ठासून सांगण्यात आले होते. एकूणच अगदी रस्त्यावरची नसली तरी मेंदू वापरणाऱ्या जनतेला तो चांगल्या प्रकारे वापरला जाण्यासाठी मिडलक्लासच्या भूमिकेच्या निमित्ताने एक विषय मिळालाय एवढ नक्की !

भारतात स्वतःचे विकासधोरण म्हणून राजकीय पक्ष ज्या-ज्या आयडिया मतदारांच्या आणि नागरिकांच्या माथी मारतात त्या बहुतेक करून परदेशी धाटणीच्या शहर केंद्रित असतात. तरीही भारतीय पद्धतीने  सजवून प्याकिंग केलेल्या सगळ्या गोष्टी सिनेम्यांनी आणि टीवीच्या कलकलाटाने डोके बधीर आणि दृष्टी क्षीण झालेल्या जनतेला अस्सल भारतीय वाटतात. यात सगळ्यात आघाडीवर असतो तो शहरी मध्यमवर्ग. किंबहुना शहरी पत्रकार व मिडिया यांच्या अत्यंत दिलदार सकारात्मक दृष्टिकोनामुळे गुबगुबीत झालेला हा मध्यमवर्ग जागतिक पातळीवर ज्या पद्धतीने राजकीय व आर्थिक कामासाठी वापरला जातो तसाच तो भारतातसुद्धा वापरला जावा अश्या पद्धतीचे वातावरण तयार करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न विचार करणाऱ्या व्यक्ती लगेच ओळखू शकतात. यामुळेच बहुतेक जगातल्या सर्व देशातला मध्यमवर्ग एकाच प्रकारच्या सुविधा आणि विकास मागतो. पण सध्या भारतातले दुखणे वेगळे आहे.

२०१४ मध्ये क्रांतिकारी विचारांनी भारावलेली तरुणाई ज्याप्रमाणे भ्रष्टाचार विरोधी लढाईच्या लाटेमध्ये गीटारगीते वाजवून मेणबत्त्या जाळत होती त्याच पद्धतीने ती येणाऱ्या काळातही रस्त्यावर उतरेल का? उतरली तर कोणत्या मुद्द्यांना घेऊन उतरेल? सध्या या प्रश्नांवर राजकारणातली तज्ञ मंडळी स्वतःच्या डोक्यावरील केस स्वतःच्या हाताने खाजवताना दिसत आहेत. तरीही या वर्गाला घेऊन पुन्हा एकदा राजकारण होणार याची झलक दिसत आहे. भलेही संख्यात्मक पातळीवर भारतात अजूनही अत्यल्प मध्यमवर्ग दिसो किंवा चीनच्या तुलनेत वाढीचा वेग तेवढा नसला तरी सत्ता मिळवणेसाठी या वर्गाचा कश्या पद्धतीने वापर केला जातो त्यावर राजकीय यश अवलंबून आहे, हे मात्र तितकच खरय!

ज्यापद्धतीने सरकार रोजगार निर्मितीमध्ये अपयशी ठरल्याची टीका होते त्यावरून मध्यमवर्ग तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडी ढिलाई आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रामुख्याने बेरोजगारीची चर्चा पुन्हा एकदा शहरीकरणाचे फायदे, मध्यमवर्गाची स्थिती आणि प्रगती याच्या आजूबाजूला घुटमळणार. किमान तश्या पद्धतीचे वातावरण तयार होत आहे. यात खरी गोची आहे ती या सर्व प्रक्रियेचा परिणाम देशाच्या विकास आराखड्यावर कसा होतो याची. शेतकरी वर्गाची भूमिका, नव उद्योजकांचे यश-अपयश, सुशिक्षित युवकांच्या मनातला पोकळ अथवा भरीव आशावाद या व अश्या अनेक घटकांमधून भारतातला मध्यमवर्ग नक्की कुणाच्या स्क्रिप्टवर नाचणार हे ठरेल. घोडामैदान दूर नाही, समस्या फक्त इतकीच आहे की हे जागतिक तज्ञ ‘भारतात मध्यमवर्गच अस्तित्वात नाही अस म्हणतायत’, त्याच्याविषयी अजून कुणाचाच चाफा बोलेना झालाय !

भारतातलं मध्यमवर्गाच राजकारण पुन्हा एकदा रिंगणात ?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
रासप जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांचा पदाचा राजीनामा

चिंचणी: राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष आकाश सातपुते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांना पाठवलीले

Close