आज ‘गुढी’ नाही: साहेबांना भागातून भावपूर्ण श्रद्धांजली0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: कडेगाव-पलूसच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचे भाग्यविधाते डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी तसेच साहेबप्रेमी नागरीकांनी आज गुढीपाडवा साजरा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा उत्स्फूर्त परीणाम कडेगाव व पलूस तसेच विटा भागातील अनेक गावांमध्ये दिसत असून अनेक ठिकाणी गुढ्या उभारल्या गेल्या नाहीत.

भागाच्या विकासाचे मूलाधार असणारे सर्वांचे ‘लाडके नेते’ व ‘विकास महर्षी’  ‘साहेब’ यांना अत्यंत हृदयपूर्वक श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय पक्ष तसेच भारती विद्यापीठ व इतर संबंधित संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी घेतला व सर्वांनी ‘यंदा गुढ्या उभ्या करायच्या नाहीत’ असे ठरवले. याला नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे.

 

कडेगाव, वांगी, सोनसळ, शिरसगाव, अंबक, मोहित्यांचे वडगाव, चिंचणी, तडसर, अपशिंगे आदी बहुसंख्य गावांमध्ये ग्रामस्थांनी गुढ्या न उभारण्याचा सामुहिक निर्णय घेतला. काल सकाळपासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक साहेबप्रेमी कार्यकर्त्यांनी ‘ साहेबांना श्रद्धांजली म्हणून यंदा गुढ्या उभारायच्या नाहीत’ हा विचार सर्वदूर पोचवला. काही ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त वार्षिक जत्रांचे आयोजन असते. अश्या गावांमध्ये ग्रामस्थांनी एकमुखी जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

कै. डॉ. पतंगराव कदम यांच्यामुळेच भागाचा प्रचंड विकास झाला आहे आणि त्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड कृतज्ञता व आदर आहे. साहेबांच्या जाण्याने इथल्या विकास प्रक्रियेमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्ते व नागरीक साश्रू दुःख व्यक्त करत आहेत.

दुःखाचे प्रचंड सावट भागातल्या अनेक गावांमध्ये व संस्थामध्ये आहे व एकूणच कडेगाव-पलूस परिसरामध्ये आहे.

साहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी गावोगाव मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत व आपल्या ‘लाडक्या नेत्याला’ श्रद्धांजली वाहत आहेत.

कडेगाव-पलूस परीसरातील अनेक गावांमध्ये शोकसभांचे आयोजन करून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

आज ‘गुढी’ नाही: साहेबांना भागातून भावपूर्ण श्रद्धांजली

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
राजकीय नीतिमत्तेचा सामाजिक आदर्श हरवला: साहेबांच्या जाण्याने ‘सोनहीरा’ पोरका झाला !

जागतिक प्रवाहाच्या कलाने काहीतरी किरकोळ सुधारणा करून त्याचे भरमसाठ मार्केटिंग करून लोकांची दिशाभूल करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या व खाजगी उद्योजकांच्या काळात

Close