केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल: भारतीय जनता सावध आहे का?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सोशल मिडीयावर ग्राहकांनी टाकलेल्या माहितीचा व त्यांच्या सोशल मिडिया वापराच्या माहितीचा गैरवापर करण्याचा एक धक्कादायक प्रकार केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल मधून जगासमोर आला आहे. युकेस्थित माहिती पृथकरण करणारी कंपनी केम्ब्रिज ऍनालायटीका चांगलीच वादात सापडली आहे. कंपनीने सर्व आरोपांचे खंडन केले आहे. नक्की काय झाले? काय आहे केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल? जाणून घेऊया.

चानेल ४, द गार्डियन, द ओब्झरवर, आणि द न्युयोर्क टाईम्स यांनी केलेल्या रिपोर्टनुसार सर्व प्रकारची मुख्यत्वे सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात असलेली बहुसंख्य वापरकर्त्यांची माहिती तसेच अश्या माहितीचा निवडणुकामधील अनैतिक वापर समोर आला आहे. यामध्ये समोर आलेल्या विडीओमध्ये केम्ब्रिज ऍनालायटीकाचे व्यवस्थापन करणारे एका छुप्या रिपोर्टरला त्यांच्या ग्राहकासाठी  (जे मुख्यत्वे राजकीय मंडळी असतात ?) विरोधकांवर दबाव तंत्र आणि सौंदर्य जाळे कशा पद्धतीने वापरता येईल याची उघड माहिती देताना दिसत आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सदर कंपनीच्या सेवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक टीमने गेल्या निवडणुकीत वापरल्या होत्या. त्याचबरोबर, अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती ग्राहकांकडून घेणारी झुकेर्बर्ग यांची  सोशल मिडिया कंपनी सुद्धा या कंपनीशी व्यावसायिक संबंध ठेवून होती, अशी माहिती समोर आली आहे. केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल समोर आल्यानंतर झुकेर्बर्ग यांच्या सोशल मिडिया कंपनीने केम्ब्रिज ऍनालायटीकाशी वेगात संबंध तोडले असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात, सध्या सुरु असलेल्या चौकशीचा निकाल येईपर्यंत संबंध तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत. घटनाक्रमावर पूर्ण नजर ठेवत प्रोसोन्जीत दत्ता यांनी बिझनेस टुडे मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.

एकूणच, जगभरातल्या लाखो ग्राहकांनी सोशल मिडीयावर ठेवलेली माहिती, केलेल्या चर्चा इत्यादी सध्या जोमात असलेल्या बिग डाटा कंपन्यासाठी माहितीचा मोठा स्त्रोत आहेत. आणि यामध्ये ‘सदर माहिती सोशल मिडिया कंपनीकडून कशी वापरली जाते’ अथवा ‘तिसऱ्या पक्षाला ती दिली जाते का’, यासंबंधी निश्चित कायदेशीर धोरणाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. ही स्थिती जर प्रगत देशांची असेल तर भारतासारख्या नवीन विकासोन्मुख अर्थव्यवस्थेने नक्की का सावध होणे आवश्यक आहे. हे समजून घ्यावे लागेल.

भारतावर काय परिणाम होऊ शकेल?

सोशल मिडिया हा लोकशाही आणि तिच्या भविष्याला हानिकारक असल्याचे केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डलमधून प्रतीत होत आहे.  भारत हा जगातला सर्वात मोठा संसदीय लोकशाही असणारा देश आहे आणि भारता सध्या सुरु असलेला बिग डाटा वापराचा राजकीय कल नक्की कोणत्या स्थितीमध्ये लोकशाहीला घेऊन जाईल याविषयी तज्ञांकडून भीती व्यक्त किली जात आहे.

सध्या सरकार स्थापन असलेल्या भाजप सरकारने २०१४ च्या निवडणुकीपासून माहिती तंत्रज्ञान विशेषतः सोशल मिडियाचा मुख्य वापर असणाऱ्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आणि यथावकाश लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणूका जिंकल्या हे सर्वज्ञात आहे. भाजपच्या केंद्रातील तसेच इतर काही राज्यातील ‘लाट’ तयार होण्यामागे सोशल मीडियाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात आला होता. इतर पक्षांना या अभिनव तंत्राचा वापर करणे तितके जमले नाही. अर्थात, निवडणुकीमधील चित्र समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सोशल मिडिया वापरासाठी उत्सुक आहेत.

याला समांतर घटना म्हणून भारतात गेल्या चार वर्षात बिग डाटा संबंधी सल्लागार कंपन्या मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल व त्याचे सोशल मिडिया वापरावरील तसेच लोकशाही व्यवस्थेवरील सर्वंकष परिणाम जाणून घेणे व कायदे तयार होण्यासाठी धोरण वकिली व पाठपुरावा करणे ही जनतेची मुख्य जबाबदारी आहे. भारतातील जनता या संदर्भात जितक्या लवकर जागरूक होईल तेवढे लोकशाही प्रक्रिया घटनात्मक व मूल्यात्मक चौकटीमध्ये राहण्याची शक्यता वाढेल.

केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल: भारतीय जनता सावध आहे का?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
मुलांच्या करीयरची दिशा लवकर ठरवणे का आवश्यक आहे?

एक काळ होता जेव्हा पालक मुलं जन्माला यायच्या आधीच ते काय बनणार हे ठरवायचे असत. भारतासारख्या जातीप्रधान कारागिरी व शेती

Close