साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभांचे महाराष्ट्रभर आयोजन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सोनहिरा खोऱ्याचे भाग्यविधाते व माजी मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांचे शुक्रवार दिनांक ९ मार्च २०१८ रोजी दुःखद निधन झाले.

त्यांना श्रद्धांजली अर्पण  करण्यासाठी महाराष्ट्रभर शोकसभा आयोजित केल्या आहेत, अशी माहिती कदम परीवाराकडून देण्यात आली आहे.

या शोकसभा मुंबई, सांगली कडेगाव, पलूस, तसेच पुणे या ठिकाणी होतील.

शिक्षणतज्ञ, सर्वांगीण विकासक आणि धडाडीचे नेते म्हणून ओळखले जाणारे साहेब त्यांच्या महाराष्ट्रभरच नव्हे तर जागतिक पातळीवर असणाऱ्या चाहत्यांना व हितचिंतकांना धक्कादायक पद्धतीने सोडून गेले. गेले काही आठवडे साहेबांच्या मतदारसंघात, संस्थामध्ये, व जागतिक पातळीवर श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात येत आहे.

सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी गुढीपाडवा साजरा न करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. यामध्ये प्रचंड संख्येने लोकांनी उत्स्फुर्तपणे गुढी न उभारून आपल्या लाडक्या साहेबांना श्रद्धांजली वाहिली.

 

साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभांचे महाराष्ट्रभर आयोजन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल: भारतीय जनता सावध आहे का?

कडेगाव: सोशल मिडीयावर ग्राहकांनी टाकलेल्या माहितीचा व त्यांच्या सोशल मिडिया वापराच्या माहितीचा गैरवापर करण्याचा एक धक्कादायक प्रकार केम्ब्रिज ऍनालायटीका स्कॅन्डल

Close