सेनेच्या सावंतपुर शाखेचे जोशात उदघाटन0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

पलूस: सावंतपूर येथील शिवसेनेचा शाखा उदघाटन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि पलूस तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे व सोबत अनेक पदाधिकारी व उत्साही शिवसैनिक तसेच नागरीक होते.

या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विभूते यांनी पलूस कडेगाव मतदार संघामध्ये संघटना बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून पदाधिकाऱ्यानी व शिवसैनिकांनी कामाला लागावे. लोकसभा व विधानसभा निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन केले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना शेतकऱ्यांच्या घरात जाऊन कर्जमाफीची फॉर्म भरून घ्या, शेतकऱ्याची कर्ज माफी किती सत्य किती असत्य हे प्रत्येक पदधिकारी व शिवसैनिकांनी स्वतः तपासून घ्यावे, असे सांगितले. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक हे सेनेचे ब्रीद वाक्य आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी शिवसेना एकमेव संघटना नेहमीच तत्पर असते, असे सांगितले.

शाखा उदघाटन प्रसंगी शरद गायकवाड, जगदीश पवार, किशोर माळी, शशिकांत पवार , महेश शिंदे , गणेश गवळी , श्रीकांत लेंगरे , आदित्य गायकवाड, सागर पाटील , रमेश वाघमारे , अमोल नरळे  ,शाखा प्रमुख सावंतपूर , हरी वडार, उप शाखा प्रमुख अमित सावंत , कैलास सावंत , अनिकेत डफळापूरे , महेंद्र पोतदार , सुधीर वायदंडे , दिगंबर जाधव , सुमित पवार , विनीत पवार , सुशांत सावंत , वीशाल माने , अतुल सुतार, मोहित देवकुळे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

सेनेच्या सावंतपुर शाखेचे जोशात उदघाटन

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभांचे महाराष्ट्रभर आयोजन

कडेगाव: सोनहिरा खोऱ्याचे भाग्यविधाते व माजी मंत्री कै. डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांचे शुक्रवार दिनांक ९ मार्च २०१८ रोजी दुःखद

Close