साहेबांच्या ‘विकास रथा’चे सारथ्य बाळासाहेबांकडे: साश्रू नयनांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: काल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये अनेक राजकीय पक्ष तसेच संघटना यांचे प्रतिनिधी आणि भागातून आलेल्या हजारो साहेबप्रेमी जनतेने श्रद्धांजली वाहिली. अत्यंत गहिवरल्या अवस्थेत साहेबांचे सुपुत्र आणि राजकीय वारसदार डॉ. विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांना साहेबांच्या विकास रथाचे सारथ्य प्रत्यक्ष जनता जनार्दनाने सुपूर्द केले. बाळासाहेबांनी ‘जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेन आणि साहेबांचा वारसा प्रामाणिकपणे आणि तितक्याच जिद्दीने पुढे नेईन’, असा भरोसा साहेबांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्ते व सामान्य नागरीकांना दिला.

तब्बल ८० पेक्षा जास्त लोकांनी कालच्या शोकसभेत भाषण करून साहेबांच्या चरणी शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी तालुक्यातील आणि जिह्यातील तसेच शेजारच्या सातारा जिल्ह्यातील अनेक नागरीक व साहेबांचे चाहते तसेच राजकीय व्यक्तीमत्वे उपस्थित होती.

श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (बाबा), शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते, त्याचबरोबर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, दीपक भोसले, राजू जाधव, सौ. मालन मोहिते, नगराध्यक्षा आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्ष साजिद पाटील, माजी सरपंच विजय शिंदे, लक्ष्मण डांगे,  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माने तसेच इतर महत्वाचे राजकीय प्रतिनिधी, मान्यवर, तसेच राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

भाषणा दरम्यान अनेकांना आपले अश्रू अनावर झाले. साहेबांचा त्यांच्या जन्मापासून ते ९ मार्च पर्यंतचा प्रवास सर्वांनी साश्रू नयनांनी उलगडून दाखवला.

अत्यंत भावपूर्ण हृदयाने श्रद्धांजली वाहताना डॉ. विश्वजीत कदम यांनी ‘साहेबांचे अनुकरण करेन, साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना साहेबांसारखेच सोबत घेईन, अशी ग्वाही दिली. साहेबांच्या अकाली जाण्याने आधार हरवलेल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला त्यामुळे निश्चितच दिलासा मिळाला आहे.

येत्या गुरुवारी २९ मार्च रोजी पुणे इथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

साहेबांच्या ‘विकास रथा’चे सारथ्य बाळासाहेबांकडे: साश्रू नयनांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
सेनेच्या सावंतपुर शाखेचे जोशात उदघाटन

पलूस: सावंतपूर येथील शिवसेनेचा शाखा उदघाटन समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि पलूस

Close