कडेगाव परीसरात सकाळी दाट धुक्याची पांघरण: शेतीसाठी चिंतेची बाब ?0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: काल रात्रीपर्यंत ‘उन्हाळा सुरु झाला’ हे पालुपद बोलून आणि ऐकून त्रस्त झालेल्या कडेगावकरांना आज सकाळी निसर्गाचे वेगळे रूप अनपेक्षितपणे पाहायला मिळाले आणि आश्चर्याचा धक्का बसला.

आज सकाळी सातच्या सुमारास अचानक सर्वत्र धुके पडले . हवामानातील हा बदल काहीसा आश्चर्याने घेणाऱ्या कडेगावकर मंडळीना तब्बल तासभर ‘हिवाळ्याचे’ फिलिंग मार्च महिना संपता संपता मिळाले. अर्थात, यामुळे दृश्यमानता खूपच कमी झाली आणि  कामाच्या लगबगीत असलेल्या लोकांना थोडासा उशीर झालाच !

काही पिकांसाठी अचानकपणे ऋतूसोडून येणारे असे धुके अपायकारक समजले जाते. शेतीवरील निसर्गाच्या परिणामाशी देणेघेणे न ठेवणाऱ्या नोकरदार मध्यमवर्गीयांसाठी मात्र आजची सकाळ खूपच थंड असल्याने काहीशी सुखद होती.

अशी धुक्याची सलग आवर्तने झाल्यास शेतकऱ्यांना निश्चितच विचार करावा लागेल. विशेषतः द्राक्षे आणि आंबा या नगदी पिकांसाठी असे धुके तितकेसे मानवणारे समजले जात नाही. या संदर्भात सरकारी हवामान खाते काय स्पष्टीकरण देते याविषयी जनतेमध्ये उत्सुकता आहे.

ते काहीही असले तरी सकाळपासून आलेले तेच-तेच मेसेज पुढे पाठवून लक्ष वेधून घेऊ इच्छिणाऱ्या ‘व्हाट्सप्या’ लोकांना मात्र चघळायला आज पक्का ‘ओरिजिनल’ विषय मिळाला आहे.

कडेगाव परीसरात सकाळी दाट धुक्याची पांघरण: शेतीसाठी चिंतेची बाब ?

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
साहेबांच्या ‘विकास रथा’चे सारथ्य बाळासाहेबांकडे: साश्रू नयनांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

कडेगाव: काल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय शोकसभेमध्ये अनेक राजकीय पक्ष तसेच संघटना यांचे प्रतिनिधी आणि भागातून आलेल्या हजारो साहेबप्रेमी जनतेने

Close