‘सेल्फहूड’ तर्फे उन्हाळी सुट्टीत भाषण शिकण्याची सुवर्णसंधी0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: सर्वांगीण पद्धतीने मानव विकास साधण्यासाठी आवश्यक त्या सेवा पुरवणाऱ्या ‘सेल्फहूड’ या संशोधन-प्रशिक्षण संस्थेतर्फे भाषण प्रशिक्षणाचा विशेष उन्हाळी वर्ग येत्या एप्रिल व मे महिन्यात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. गोविंद धस्के यांनी दिली.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक, शैक्षणिक तसेच नोकरी विश्वासात वाढत चाललेली स्पर्धा, प्रशासकीय सेवांकडे विध्यार्थ्यांचा असलेला कल आदी गोष्टी विचारात घेता फक्त सामान्य संभाषण कौशल्ये नव्हे तर भाषण करू शकणे हे अत्यंत आवश्यक झाले आहे.

परंतु, भाषण करायला व्यावसायिक पद्धतीने शिकवणारी कोणतीही व्यवस्था अगदी प्रगत समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातही नाही. अशा स्थितीत भाषण करू इच्छिणाऱ्या परंतु करू न शकणाऱ्या राजकीय-सामाजिक व्यक्तींसाठी व विध्यार्थी वर्गासाठी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे सेल्फहूड तर्फे सांगण्यात आले.

या विशेष उन्हाळी वर्गामध्ये सुरवातीला व शेवटी विशेष समुपदेशन सत्राद्वारे भाषण करू इच्छिणाऱ्या प्रशिक्षनार्थींच्या समस्यांची खोलात जाऊन माहिती घेतली जाईल आणि त्यावर पुष्पौषधी, योग, प्राणायाम, मुद्रा, ध्यान, सर्वांगीण जीवन शैली, मानसिक व्यायाम, स्मरणशक्तीचे विशेष व्यायाम आदी वापरून सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन देण्यात येईल.

एकाचवेळी व्यक्तिमत्व विकास, वैचारीक विकास, शैली, आणि भाषणाची तांत्रिक कौशल्ये एकत्रितपणे शिकवणारा हा एकमेव भाषण प्रशिक्षण वर्ग असल्याचे सांगण्यात आले.

सलग पाच रविवार दुपारी १ ते ४: ३० वेळेत चालणारे हे प्रशिक्षण देहबोली, भाषण तयार करणे, सादरीकरण, पेहराव, आवाजातील चढ उतार , ऐकण्याची कौशल्ये, श्रोत्यांचे पृथ्करण या व अश्या अनेक विषयावर शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करेल. या सोबतच विशेष सराव सत्र घेऊन प्रशिक्षणार्थीना आवश्यक ते बदल करण्याचे मार्गदर्शन देण्यात येईल.

भाषण करण्याची भीती व आत्मविश्वासाचा अभाव या दोन प्रमुख समस्यांवर अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले जात आहे व त्याचा फायदा अनेकांना झाला असल्याचे, संचालकांतर्फे सांगण्यात आले.

एप्रिल व मे महिन्यात सलग ५ रविवार चालणाऱ्या या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया वेगात सुरु असून  माहिती मिळवण्यासाठी व नोंदणीसाठी  ९८१९१७९३७७ वर डॉ. गोविंद धस्के यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सेल्फहूड तर्फे करण्यात आले आहे.

‘सेल्फहूड’ तर्फे उन्हाळी सुट्टीत भाषण शिकण्याची सुवर्णसंधी

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
कडेगाव परीसरात सकाळी दाट धुक्याची पांघरण: शेतीसाठी चिंतेची बाब ?

कडेगाव: काल रात्रीपर्यंत 'उन्हाळा सुरु झाला' हे पालुपद बोलून आणि ऐकून त्रस्त झालेल्या कडेगावकरांना आज सकाळी निसर्गाचे वेगळे रूप अनपेक्षितपणे

Close