बालगृहात खाऊ वाटप करून ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’च्या निकेतन कांबळे यांनी वाढदिवशी ठेवला सामाजिक आदर्श0 मिनिटे

Print Friendly, PDF & Email

कडेगाव: येथील नामवंत इंजिनियर आणि ज्ञानहिरा बिल्डकॉनचे सर्वेसर्वा निकेतन कांबळे यांनी अत्यंत सामाजिक जाणीवेने वाढदिवस साजरा करत कराड येथील बालगृहात खाऊ वाटप केले.

सामान्य मुलांसारख्या आनंदापासून काहीसे दूर असलेल्या बालगृहातील मुलांना या निमित्ताने खूप आनंद झाला होता.

अत्यंत कृतज्ञ भावनेने बालगृहाच्या व्यवस्थापनाने निकेतन कांबळे यांचे आभार मानले.

वाढदिवस म्हणजे रंगीत-संगीत पार्ट्या आणि नको तशी पैश्यांची उधळपट्टी असा बहुतेक ठिकाणी तरुणाईचा ट्रेंड असताना निकेतन कांबळे यांच्यासारख्या सुशिक्षित व्यावसायिक तरुणाने समोर येवून सामाजिक आदर्श दाखवून दिला आहे.

तरुण पिढीच्या वागण्याने भविष्याविषयी निराश झालेल्या सामाजिक वातावरणात यामुळे चैतन्याची आणि आशेची लहर तयार झाली आहे. गरीब, अनाथ आणि निराश्रित मुलांसाठी निवारा असणारे बालगृह हे सामान्यतः वाढदिवसासारख्या कार्यक्रमांपासून वंचित असते. तिथल्या मुलांना असा आनंद मिळवून देणे, हे अत्यंत कौतुकास्पद काम करून निकेतन कांबळे यांनी निश्चितच एक नवीन पायंडा पाडला आहे.

स्वतःचा मोठा मित्रपरीवार, कुटुंबीय आणि व्यावसायिक नातेसंबंध असणारे अनेक सहकारी यांना आश्चर्याचा धक्का देत कराडच्या कै. क्रांतिवीर माधवराव जाधव बालगृह येथे निकेतन कांबळे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी ४० पेक्षा जास्त संख्येने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. खाऊ वाटपा सोबतच निकेतन यांनी पूर्ण दिवस मुलांच्याबरोबर व्यतीत केला.

सामाजिक पद्धतीने वाढदिवस साजरा करून आदर्श समोर ठेवल्याबद्दल निकेतन कांबळे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

बालगृहात खाऊ वाटप करून ‘ज्ञानहिरा बिल्डकॉन’च्या निकेतन कांबळे यांनी वाढदिवशी ठेवला सामाजिक आदर्श

by कडेगाव-पलूस लाइव न्यूज टिम वाचनाचा वेळ: <1 min
0
Read previous post:
साहेबांना आज कराडमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची श्रद्धांजली

कराड:  स्व. आ. डॉ. पतंगरावजी कदम (साहेब) यांना कराड व पाटण तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांतर्फे श्रध्दाजंली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन आज कराड

Close